Share

अटल बिहारी वाजपेयींची जीवनगाथा येणार मोठ्या पडद्यावर; ‘या’ दिवशी प्रदर्शित होणार चित्रपट

भारताचे माजी पंतप्रधान आणि भाजपचे ज्येष्ठ नेते अटल बिहारी वाजपेयी(Atal Bihari Vajpayee) यांच्या आयुष्यावर आधारित चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाचे नाव ‘अटल’ असे आहे. नुकतेच या चित्रपटाचे मोशन पोस्टर प्रदर्शित करण्यात आले आहे. हा चित्रपट २५ डिसेंबर २०२३ ला प्रदर्शित होणार आहे.(Atal Bihari Vajpayee’s life story will come on the big screen)

बॉलिवूडमध्ये सध्या अनेक बायोपिक प्रदर्शित होत आहेत. काही दिवसांपूर्वी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जीवनावर आधारित चित्रपटाची घोषणा करण्यात आली होती. संदीप सिंग यांनी या चित्रपटाची निर्मिती केली होती. आता भारताचे माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या जीवनावर आधारित ‘अटल’ हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.

हा चित्रपट भारताचे माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या ९९ व्या जयंतीचे औचित्य साधून प्रदर्शित केला जाणार आहे. ‘अटल’ या चित्रपटाचे नुकतेच मोशन पोस्टर रिलीज करण्यात आले आहे. ‘में रहूं या न रहूं ये देश रहना चाहिए’ हे ज्येष्ठ नेते अटल बिहारी वाजपेयी यांचे भाषणातील वाक्य या पोस्टरवर लिहिण्यात आले आहे.

विनोद भानुशाली आणि संदीप सिंग यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे. हा चित्रपट ‘द अनटोल्ड वाजपेयी: पॉलिटिशियन अँड पॅराडॉक्स’ या पुस्तकावर आधारित आहे. या चित्रपटाच्या शूटिंगला सुरवात झाल्याचे सांगितले जात आहे. या चित्रपटात भारताचे माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांची भूमिका कोणता अभिनेता साकारणार? याबाबत अद्याप माहिती मिळालेली नाही.

अटल बिहारी वाजपेयी यांच्या बालपणापासून ते भारताचे पंतप्रधान बनण्यापर्यंतची कथा या चित्रपटात दाखवली जाणार आहे. अटल बिहारी वाजपेयी यांच्या आयुष्याबद्दल फार कमी लोकांना माहिती आहे. अटल बिहारी वाजपेयी यांच्या आयुष्यातील अनेक घटनांचा या कथेमध्ये समावेश करण्यात आल्याचे चित्रपटाच्या निर्मात्यांनी सांगितले.

२५ डिसेंबर १९२४ रोजी अटल बिहारी वाजपेयी यांचा जन्म झाला. अटल बिहारी वाजपेयी उत्कृष्ठ वक्ते होते. तसेच अटल बिहारी वाजपेयी एक प्रसिद्ध कवी आणि लेखकही होते. १९९८ ते २००४ या काळात अटल बिहारी वाजपेयी भारताचे पंतप्रधान होते. १९८० ते १९८६ या काळात अटल बिहारी वाजपेयी भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष होते.

महत्वाच्या बातम्या :-
उद्योगक्षेत्रातून धक्कादायक बातमी! मुकेश अंबानींनी तडकाफडकी दिला रिलायन्सचा राजीनामा
गर्लफ्रेंड असतानाही मुलींसोबत फ्लर्ट करायचा मिका सिंग, मुलांच्या नावाने सेव्ह करायचा मुलींचे नंबर
‘या’ 10 बॉलिवूड अभिनेत्री लग्नाच्या आधीच होत्या प्रेग्नेंट, एक तर लग्न न करताच झाली होती आई

 

ताज्या बातम्या बाॅलीवुड मनोरंजन राजकारण

Join WhatsApp

Join Now