फिल्मी जग शोशासाठी ओळखले जाते. येथे अनेकदा पार्ट्या आयोजित केल्या जातात. जिथे बॉलीवूड(Bollywood) सेलिब्रिटींची जमवाजमव असते, पण कधी कधी या पार्ट्यांमध्ये असे घडते जे कलाकारांच्या मनात आयुष्यभर घर करून राहते, असाच प्रकार अमिताभ बच्चन यांच्यासोबत एका पार्टीत घडला. एका मुलाखतीत त्यांनी याचा उल्लेख केला होता.(at-the-party-of-yaa-actress-people-had-thrown-food-at-each-other)
ही गोष्ट त्यावेळची आहे जेव्हा ते इंडस्ट्रीत पाऊल ठेवण्याच्या तयारीत होते. ज्या पार्टीला आमंत्रित करण्यात आले होते, तेथील वातावरण पाहून अमिताभ(Amitabh Bachchan) आश्चर्यचकित झाले. 1968 ची गोष्ट आहे जेव्हा अमिताभ बच्चन अभिनेता बनण्याच्या इराद्याने मुंबईत पोहोचले होते.
इथे तारा स्टुडिओमध्ये त्यांची स्क्रीन टेस्ट सुरू झाली. दिग्दर्शक मोहन सहगल यांनी घेतली होती. या टेस्टनंतर ते सुनील दत्त आणि नर्गिस दत्त(Nargis Dutt) यांच्या पार्टीत गेले होते.
पहिल्यांदाच मुंबईत एका पार्टीत अमिताभ बच्चन यांना होस्ट करणारे ते एकमेव कपल होते. या पार्टीनंतर त्यांना दुसऱ्या पार्टीत नेण्यात आले. ही पार्टी प्रसिद्ध अभिनेत्री साधना यांची होती. त्यांच्या घरी ही पार्टी आयोजित करण्यात आली होती.
या पार्टीत प्रोड्यूसर आणि जर्नलिस्ट यांच्यात वाद झाला आणि त्यांनी एकमेकांवर जेवण फेकण्यास सुरुवात केली. काही वेळातच पार्टीत उपस्थित सर्व लोक एकमेकांवर जेवण फेकताना दिसले. हे वातावरण पाहून अमिताभ आश्चर्यचकित झाले.
साधना तिथून आपल्या कामाला गेल्याचे पाहून अमिताभ आणखीनच थक्क झाले. यानंतर ते पुन्हा दिल्लीत(Delhi) वडिलांकडे गेले. अनेक दिवस येथील ही घटना आठवून ते अस्वस्थ झाले होते.