politics: दसरा मेळावा उद्धव ठाकरे घेणार की एकनाथ शिंदे? याचा तिढा अजून सुटलेला नाही. शिवसेनेचा दसरा मेळावा शिवतीर्थावर होणार आहे का, याबाबत निश्चित माहिती समोर आलेली नाही. तेच नवी चर्चा रंगली आहे. शिवसेनेकडून या दसरा मेळाव्यात नेतृत्वाबाबत नवीन मोठी घोषणा होणार असल्याचे संकेत दिले जात आहेत.
शिवसेनेने दसरा मेळाव्याची जय्यत तयारी सुरू केली आहे. त्यासाठी विविध ठिकाणी मोठे बॅनर्स लावले जात आहेत. त्या बॅनरवर हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे, उद्धव ठाकरे तसेच आदित्य ठाकरे यांसोबत तेजस ठाकरेंचा सुद्धा फोटो असल्याने अनेकांकडून याबाबत आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
या दसरा मेळाव्यात शिवसेनेकडून तेजस ठाकरेंच्या रूपाने नव्या युवा नेतृत्वाची घोषणा केली जाते की काय? याची चांगलीच चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. शिवसेनेकडून दसरा मेळाव्याचे जे बॅनर झळकत आहेत. त्यात आदित्य ठाकरेंसोबत तेजस ठाकरेंचा फोटो आहे. तेजस ठाकरे हे राजकारणात फार सक्रिय नाहीत. मात्र अत्यंत हुशार असणारे तेजस ठाकरे वन्य संशोधन करतात.
शिवसेनेच्या बॅनर्सवर आता ताकद दाखवणारच गद्दारांना क्षमा नाही, चलो शिवतीर्थ! असा संदेश दिला जात आहे. शिवसेनेला दसरा मेळावा शिवतीर्थावरच घ्यायचा आहे, हे या संदेशातून स्पष्ट होते. तसेच दसरा मेळावा ज्या ठिकाणी होणार त्याचा उल्लेख बॅनरवर आढळून येतो.
शिवसेनेला दसरा मेळावा घेण्यास शिवतीर्थावर परवानगी नसेल तर बाहेर रस्त्यावर उभं राहून मेळावा घेऊ, असा निर्धार उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला आहे. आता दसरा मेळावा नक्की कोण घेईल? याबाबत राज्यातील जनतेमध्ये उत्सुकता वाढली आहे.
शिवसेनेच्या आजच्या पडत्या काळात उद्धव ठाकरेंकडून तेजस ठाकरेंना राजकारणात आणले जाईल, अशी चर्चा होत आहे. दसरा मेळाव्याच्या निमित्ताने ही मोठी घोषणा होईल, असे संकेत त्या बॅनरवरून मिळत असल्याचे दिसते. तेजस ठाकरे राजकारणात सक्रिय नसले तरी ते शिवसेनेच्या पक्ष संघटनासाठी व ठाकरे परिवारासाठी कायम पुढे सरसावलेले दिसतात.
महत्वाच्या बातम्या-
Chief Minister : दारूच्या नशेत असल्यामुळे मुख्यमंत्र्यांना विमानातून खाली उतरवले?; आपचे भगवंत मान यांच्यावर विरोधकांचा गंभीर आरोप
cm eknath shinde : मुख्यमंत्री शिंदे 40 आमदारांना सोबत घेऊन थेट दिल्ली दरबारी जाणार; पुन्हा होणार राजकीय भूकंप
shinde group : शिवसेनेचं अस्तित्व धोक्यात..! सत्ता तर गेली आता उद्धव ठाकरे महानगरपालिकाही गमावणार; वाचा नेमकं सेनेत चाललंय काय?