अमेरिकन श्रीमंत आणि उद्योगपतींचे वैवाहिक जीवन चांगले जात नाही. त्यांचे सातत्याने घटस्फोट होत असतात अशा अनेक बातम्या आपल्याला ऐकायला मिळतात. घटस्फोटितांच्या यादीत आणखी एक नाव जोडले जाणार आहे. ते म्हणजे ऑस्ट्रेलियन-अमेरिकन उद्योगपती आणि मीडिया मोगल या नावाने जगभर प्रसिद्ध असलेल्या रुपर्ड मर्डोक (Rupert Murdoch) हे आहे.(Rupert Murdoch, Media Mogul, Divorce, Marital Life)
रुपर्ड मर्डोक वयाच्या ९१ व्या वर्षी चौथ्यांदा घटस्फोट घेणार आहे. रुपर्ड मर्डोकने त्याची सुपरमॉडेल पत्नी जेरी हॉलपासून विभक्त होण्याचा निर्णय घेतला आहे, जो आतापर्यंतचा सर्वात महागडा घटस्फोट मानला जातो. रुपर्ड मर्डोक यांचे याआधी तीन वेळा घटस्फोट झाले आहे. जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींपैकी एक असलेल्या रुपर्ड मर्डोकने २०१६ मध्ये जेरी हॉलसोबत चौथ्यांदा लग्न केले होते, पण आता दोघेही लग्नाच्या ६ वर्षानंतर वेगळे होत आहेत.
रुपर्ड मर्डोक यांच्याकडे सुमारे १४ अब्ज रुपयांची संपत्ती आहे. अशा परिस्थितीत हा जगातील आतापर्यंतचा सर्वात महागडा घटस्फोट असेल, असे बोलले जात आहे. ‘द न्यूयॉर्क टाइम्स’मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीनुसार, रुपर्ड मर्डोक लवकरच घटस्फोटासाठी अर्ज दाखल करणार आहे.
रुपर्ड मर्डोकने आतापर्यंत एकूण ४ लग्ने केली आहेत. त्यांचे कोणतेही लग्न फार काळ टिकले नाही. त्यांचे पहिले लग्न १९५६ मध्ये पॅट्रिशिया बुकर यांच्याशी झाले होते. पण दोघेही १९६७ मध्ये वेगळे झाले. यानंतर मर्डोकने १९६७ मध्ये दुसरे लग्न केले. यावेळी त्यांनी अॅना मारिया टोर्व्हसोबत लग्न केले. हे लग्न जवळपास ३२ वर्षे चालले आणि १९९९ मध्ये दोघेही वेगळे झाले.
यानंतर रुपर्ड मर्डोकने १९९९ मध्ये तिसरे लग्न केले, जे २०१३ पर्यंत टिकले. हे लग्नही संपुष्टात आल्यानंतर रुपर्ड मर्डोकने २०१६ मध्ये जेरी हॉलशी लग्न केले, ज्यांनी ‘बॅटमॅन’ आणि ‘द ग्रॅज्युएट’ सारख्या हॉलिवूड चित्रपटांमध्ये काम केले आहे. जेरी हॉल रूपर्ड मर्डोकपेक्षा ३० वर्षांनी लहान आहे.
महत्वाच्या बातम्या-
११ वेळा लग्न केलं तरी महिलेला मिळाला नाही मनासारखा जोडीदार, आता म्हणतेय, एखादी व्यक्ती नक्की..
१० लाख हुंडा घेऊन नपुंसक मुलाशी लावून दिले लग्न, सुहागरातला पोलखोल झाल्यानंतर नंदेने
बड्या पक्षाच्या आमदाराने स्वत:च्याच लग्नात लावली गैरहजेरी, संतापलेल्या नवरीने उचललं हे धक्कदायक पाऊल
बॉलीवूडचा तो बाप जो मुलगी लग्नाआधी प्रेग्नेंट असतानाही तिच्या पाठीशी उभा होता, नाव वाचून अवाक व्हाल