Share

‘त्यावेळी फारूक अब्दुल्ला नाही, तर राज्यपालांचं शासन होतं’; ‘द काश्मीर फाईल्स’ वर ओमर अब्दुल्लांची प्रतिक्रिया

विवेक अग्निहोत्रीचा ‘द काश्मीर फाईल्स’ चित्रपट सध्या बॉक्सऑफीस वरती धुमाकूळ घालत आहे. चित्रपटगृहांमध्ये याचे शो हाऊसफुल्ल होत आहेत. या चित्रपटाचे राजकारणात देखील पडसाद उमटले आहेत. काहींनी चित्रपटाचे कौतुक केले, तर काहींनी टीका. यातच आता जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

‘द काश्मीर फाईल्स’ या चित्रपटात 90 च्या दशकात काश्मीरमधील काश्मिरी पंडित आणि हिंदूंच्या हत्याकांडाची आणि पलायनाची कहाणी सांगण्यात आली आहे. या कहानीवरून राजकारणात वेगवेगळ्या विचारसरणीचे लोक आपली मतं मांडत आहेत. काहीजण चित्रपटाचे कौतूक करत आहेत, तर काही जण विरोध करत आहेत.

या चित्रपटावर ओमर अब्दुल्ला यांनी प्रतिक्रिया दिली आहे म्हणाले, ‘द कश्मीर फाईल्स’ हा चित्रपट आहे की डॉक्युमेंटरी हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. काश्मिरी पंडितांनाच पळून जावे लागले असे नाही. तर मुस्लिम आणि शीखही मारले गेले. त्यांनाही काश्मीरमधून पळून जावे लागले होते. यावेळी दक्षिण काश्मीरमधील कुलगाम जिल्ह्यातील एका रॅलीनंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला होता.

म्हणाले, हा चित्रपट वास्तवावर आधारित असल्याचा दावा निर्मात्यांनी केला आहे. पण, वस्तुस्थिती अशी आहे की, या चित्रपटात अनेक गोष्टी या खोट्या आहेत. सर्वांत मोठं खोटं म्हणजे, त्यावेळी नॅशनल कॉन्फरन्सचं सरकार होतं, असं चित्रपटात दाखवण्यात आलं आहे, जे की खोटं आहे.

https://twitter.com/ANI/status/1504767505642192899?t=4KrLk3lJtg3DdvGwkrQuMw&s=19

‘द कश्मीर फाईल्स’ या चित्रपटात संपूर्ण सत्य दाखवण्यात आलेले नाही. काश्मिरी पंडित जेव्हा काश्मिरमधून निघून गेले तेव्हा फारुख अब्दुल्ला हे जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री नव्हते. तर त्यावेळी राज्यपाल राजवट लागू होती. केंद्रात व्ही.पी. सिंग यांच्या नेतृत्वाखाली भाजप सरकार होते. असे ओमर अब्दुल्ला यांनी सांगितले.

चित्रपटाच्या यशाबद्दल सांगायचे झाल्यास, सुरुवातीला हा चित्रपट फक्त 700 स्क्रीन्सवर रिलीज झाला होता, पण जबरदस्त यश पाहून तो 2000 स्क्रीन्सवर रिलीज करण्यात आला. हा चित्रपट 11 मार्चला प्रदर्शित झाला. कमी बजेटमध्ये बनलेल्या या चित्रपटाने पाचव्या दिवसाअखेरपर्यंत 60 कोटींहून अधिक रुपयांची कमाई केली होती. यासोबतच अनेक राज्यांमध्ये हा चित्रपट करमुक्तही करण्यात आला आहे.

राजकारण

Join WhatsApp

Join Now