आपल्याकडे क्वचितच वृद्ध व्यक्ती डान्स करताना किंवा मस्करी करताना दिसतात. त्यांना आपल्यासोबत नाचायला लावणे म्हणजेच खूपच मोठे आवाहन असते. परंतु काही वृद्ध व्यक्ती अशा गोष्टींना अपवाद ठरतात. ते कोणत्याही गोष्टीची परवा न करता आयुष्याचे मजे घेताना दिसतात.
अशाच दोन वृद्ध आजोबांचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडिओने सध्या मीडियावर धुमाकूळ घातली आहे. नेटकरी या दोन आजोबांच्या व्हिडिओला पाहून थक्क झाले आहेत. समोर आलेल्या व्हिडिओत दोन वृद्ध आजोबा सनई चौघडेच्या तालावर जबरदस्त डान्स करताना दिसत आहेत.
https://twitter.com/Ratnesh191298/status/1509808325097324544?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1509808325097324544%7Ctwgr%5E%7Ctwcon%5Es1_c10&ref_url=https%3A%2F%2Fwww.loksatta.com%2Ftrending%2Fhearing-the-sound-of-drums-these-old-men-could-not-control-their-excitement-you-too-will-be-shocked-by-watching-viral-video-pvp-97-2871918%2F
आपण या व्हिडिओत पाहू शकतो की, सनईचा आवाज कानावर पडताच या दोन आजोबांनी नाचायला सुरूवात केली आहे. विशेष म्हणजे हे दोघे काठीच्या मदतीने डान्स करत आहेत. त्यांचा हा डान्स पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी जमा झाली आहे.
सांगण्यात येत आहे की, हा व्हिडिओ एका गावातील कार्यक्रमातला व्हिडीओ आहे. या कार्यक्रमात दोन्ही आजोबा मनमुराद नाचले आहेत. त्यांच्या समोर आजचे तरुणही फिके पडले आहेत. या व्हिडिओला @Ratnesh191298 नावाच्या ट्विटर अकाउंटवरून शेअर करण्यात आले आहे.
आता पर्यंत या व्हिडिओचे लाखोंपर्यंत व्ह्यूज गेले आहेत. अनेकांनी व्हिडिओला शेअर केले आहे. तसेच या दोन्ही आजोबांचे सर्वजण कौतुक करताना दिसत आहेत. दरम्यान आपल्या उतरत्या वयात आजोबा नातवंडांसोबत खेळताना दिसतात. मात्र हे आजोबा चक्क डान्स करताना दिसल्यामुळे याचे सर्वांनाच आश्चर्य वाटते आहे.
महत्वाच्या बातम्या
राजकुमार रावची झाली फसवणूक, स्वतःच पोस्ट शेअर करत दिली माहिती, म्हणाला, कोणीतरी माझ्या नावावर..
अभिनेता राजकुमार रावच्या नावावर भलत्यानेच घेतलं कर्ज, पॅनकार्डचा वापर करत घातला गंडा, अभिनेताही झाला हैराण
शिवसेना आमदाराच्या बंगल्यावर तोतया अधिकाऱ्याची धाड; म्हणाला, ‘सगळी कागदपत्रं…’
PHOTO: नऊवारी साडी, नाकात नथ, हातात बांगड्या, श्रद्धा कपूरचा महाराष्ट्रीयन लुक पाहून चाहते घायाळ