Share

‘मुसलमान असल्यामुळे सिकंदरसोबत…’; कुस्तीसम्राट अस्लम काझींच्या वक्तव्याने उडाली खळबळ!

sikandar shaikh

महाराष्ट्र केसरी स्पर्धेत पराभूत झालेल्या सिकंदर शेखची सर्वत्र चर्चा होत आहे. पंचांनी दिलेल्या निर्णयावरून झालेल्या वादग्रस्त निर्णयामुळे सिकंदर उपांत्य फेरीत पराभूत झाला. यावर महाराष्ट्रातील अनेक कुस्ती चाहत्यांनी नाराजी व्यक्त करत सिकंदरवर अन्याय झाल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली.

महाराष्ट्र केसरीच्या उपांत्य फेरीत सिकंदर शेख वर जाणूनबुजून अन्याय करण्यात आला आहे. असा आरोप सोशल मीडियावर केला जातोय. दरम्यान सिकंदरच्या कुटुंबीयांनी देखील स्पर्धेतील पंचांवर गंभीर आरोप केले आहेत. सिंकदर मुस्लिम समाजाचा असल्याने स्पर्धेत त्याला डावलून कमी गुण देण्यात आले. अशा चर्चांना सोशल मीडियावर उत आला आहे.

सोशल मीडियावर सिकंदरच्या समर्थनार्थ अनेक स्टेटसही पाहायला मिळाले. अशा स्थितीत कुस्तीचा बादशहा म्हणवल्या जाणाऱ्या अस्लम काझी यांनी हा निर्णय पक्षपात असल्याचे म्हटले आहे. यासोबतच कुस्तीला जातीचा रंग देऊ नये, असेही ते म्हणाले आहेत.

मी स्वतः मुस्लिम आहे आणि गेल्या २० वर्षांपासून कुस्ती खेळत आहे. मला प्रशिक्षण केंद्रासाठी पैसे देणारी व्यक्ती मारवाडी समाजातील आहे आणि माझ्या तालमीचे नाव छत्रपती शिवराय कुस्ती संकुल आहे कारण येथे सर्व जाती धर्माचे लोक आहेत.

कुस्ती हा जातीचा खेळ नाही, त्यामुळे अशा बाबींना जातीय रंग देऊ नका, असे आवाहन अस्लम काझी यांनी केले आहे. सिकंदर शेख प्रकरणात जातीय रंग देण्यात आला असून पैलवान ही आमची जात आहे. अस्लम काझी असो किंवा सिकंदर असो आमच्यावर सर्व जाती-धर्माचे लोक प्रेम करत आहेत.

अस्लम काझी पुढे असेही म्हणाले की, आम्ही दररोज बजरंग बलीच्या नावाची पूजा करतो आणि त्यांचीच सेवा करण्यासाठी आखाड्यात उतरतो. कोणत्याही आखाड्यात बजरंग बली हनुमानाला नमन करूनच कुस्ती खेळली जाते. आम्हीही याला अपवाद नाही आहोत.

सिकंदरच्या वादग्रस्त कुस्तीबद्दल अस्लम काझी काय म्हणाले?
मी याबद्दल राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पंचांशी बोललो आणि ते म्हणतात की महेंद्रला 2 गुण आणि सिकंदरला 1 गुण द्यायला हवा होता, म्हणून मला असे वाटते की सिकंदरबाबत दोन गुणांचा पक्षपात झाला आहे.

पण अस्लम काझी म्हणतात की पंचांनी ही चूक जाणीवपूर्वक केलेली चूक नसून, नकळत किंवा अनावधाने ही चूक झालेली आहे. त्यामुळे याला कुठलाही जातीय किंवा धार्मिक रंग देने चूकीचे असल्याचे त्यांनी म्हटले आहे. ते सिकंदर मुस्लिम होता म्हणून पंच तसे वागले नाहीत तर ते नकळत झाले आहे.

कुस्तीपटूंना पैलवान ही एकच जात असते. सर्व धर्माचे पैलवान तालमीत जाऊन व्यायाम करताना, बजरंग बलीच्या पाया पडून व्यायाम सुरू करतात. त्यानंतरच ते कुस्तीचा सराव करतात. मागील १० वर्ष मी सतत कुस्त्या जिंकल्या. परंतु, जातीचं राजकारण कुठेही झाले नाही. असे ते म्हणाले आहेत.

याशिवाय सिकंदर बद्दल बोलताना ते म्हणाले की,” मी सिकंदरला फोनवरून संपर्क करून त्याची समजूत काढली आहे. हार मान्य करत नव्या जोमाने तयारीला लाग आणि पुन्हा एकदा महाराष्ट्र केसरी स्पर्धेत उतरून अंतिम सामन्यात गदा जिंकून दाखव. असा सल्ला देखील दिला आहे.

महत्वाच्या बातम्या-
उर्फी जावेदला सार्वजनिक ठिकाणी अतरंगी कपडे घालून फिरण पडणार महागात, मुंबई पोलिसांनी पाठवली नोटीस

सिकंदर शेखचे महाराष्ट्र केसरी जिंकण्याचे स्वप्न भंगले, लोक म्हणाले, त्याच्यावर अन्याय झाला कारण…
शिवसेना, धनुष्यबाणाचा निर्णय शिंदे गटाच्या बाजूने लागला तर ‘हा’ असेल ठाकरे गटाचा प्लान बी

ताज्या बातम्या खेळ

Join WhatsApp

Join Now