Share

‘भाभीजी घर पर हैं’ मध्ये 300 हून अधिक व्यक्तिरेखा साकारणाऱ्या आसिफने केला वर्ल्ड रेकॉर्ड, वाचून अवाक व्हाल

भाभी जी घर पर हैं’ ही कॉमेडी टीव्ही मालिका 2015 पासून प्रसारित होत आहे आणि अजूनही प्रेक्षकांचे भरपूर मनोरंजन करत आहे. या टीव्ही मालिकेत आसिफ शेख विभूती नारायण मिश्रा यांच्या भूमिकेत, शुभांगी अत्रे अंगूरी भाभीच्या भूमिकेत आणि रोहितेश गौर मनमोहन तिवारीच्या भूमिकेत पाहायला मिळतात. आज आम्ही तुम्हाला या टीव्ही सीरियलमधील विभूती भैय्या या भूमिकेत घराघरात प्रसिद्ध झालेल्या आसिफ शेखबद्दल सांगणार आहोत.(Asif, who has more than 300 personalities, set a world record)

आसिफचे नाव आज टीव्ही इंडस्ट्रीतील प्रसिद्ध स्टार्समध्ये समाविष्ट आहे, जरी एक काळ असा होता जेव्हा आसिफला त्याच्या आयुष्यातील अत्यंत वाईट टप्प्यातून जावे लागले होते. मीडिया रिपोर्ट्सनुसार, एक काळ असा होता जेव्हा आसिफकडे काम नव्हते. याचा परिणाम असा झाला की हळूहळू आसिफची बचतही संपुष्टात आली होती आणि त्याला पैशांची तीव्र टंचाई निर्माण झाली. बातमीनुसार, घर चालवण्यासाठी आसिफला त्याची एक सोन्याची चेनही विकावी लागली होती.

Bhabi Ji Ghar Par Hai Vibhuti Narayan aka Aasif Sheikh was penniless at the moment but now he charges this much fees

मात्र, अभिनेत्याच्या म्हणण्यानुसार, या वाईट काळात सलमान खान स्वत: त्याच्या मदतीसाठी पुढे आला होता. आसिफने एका मुलाखतीत सांगितले होते की, सलमान खान त्याचा चांगला मित्र आहे आणि जेव्हा त्याच्यावर वाईट वेळ आली तेव्हा सलमान खानने पुढे होऊन त्याला मदत केली.  आसिफ आज टीव्ही इंडस्ट्रीतील एक मोठे नाव आहे आणि ‘भाबी जी घर पर हैं’च्या एका एपिसोडसाठी त्याला 70 हजार रुपये मिळतात.

‘भाभीजी घर पर हैं’ हा शो गेल्या 6 वर्षांपासून सुरू आहे. शोमधील प्रत्येक पात्र प्रेक्षकांना खूप हसवते आणि त्यांचा दिवसभराचा थकवा दूर करते. या शोमध्ये आसिफ शेख विभूती नारायण मिश्राची भूमिका साकारत आहे. पण या व्यक्तिरेखेत असूनही त्याने या शोमध्ये 300 हून अधिक वेगवेगळ्या भूमिका साकारल्या आहेत. असे करणारा तो जगातील एकमेव कलाकार आहे, त्यामुळे त्याच्या नावाची नोंद वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्डमध्ये झाली आहे. असिफ शेखने इन्स्टाग्रामवर प्रमाणपत्रासोबतचा फोटो शेअर करून ही आनंदाची बातमी सर्वांना दिली आहे.

‘भाभी जी घर पर हैं’ शो 2015 मध्ये सुरू झाला. तेव्हापासून आजतागायत या शोमधील कलाकार आणि पात्रांनी प्रेक्षकांच्या हृदयात स्थान निर्माण केले आहे. आसिफ शेख ज्येष्ठ अभिनेते आहे, त्यामुळे त्याने विभूती मिश्राची भूमिका खूप छान साकारली आणि लोकांना त्याचे काम खूप आवडले. यादरम्यान तो कधी नकली पोलीस अधिकारी म्हणून दिसला तर कधी बनावट कवी बनून लोकांना हसवले.

महत्वाच्या बातम्या-
झुंड चित्रपटासाठी ‘भावना भाभी’ची निवड कशी झाली? वाचा तिनेच सांगीतलेला भन्नाट किस्सा
“माझी सैराटसाठी निवड झाली नाही, पण अचानक”, ‘झुंड’मधील ‘भावना भाभी’ने सांगितला भन्नाट किस्सा
भाभी जी घर पर है मालिकेतील हप्पु सिंग एका एपिसोडचे घेतो तब्बल इतके पैसे; वाचून बसेल धक्का
सपना भाभीने काढला हॉट सेल्फी, प्रायव्हेट फोटो शेअर करत सोशल मिडीयावर उडवून दिली खळबळ

ताज्या बातम्या मनोरंजन

Join WhatsApp

Join Now