स्टार प्रवाहावरील आई कुठे काय करते मालिका एका वेगळया वळणावर येऊन पोहचली आहे. या मालिकेत आशुतोषने सर्व कुटुंबासमोर अरुंधतीवरच्या प्रेमाची कबुली दिली आहे. परंतु त्याच्या या कबुलीनंतर आशुतोषकडे पाहण्याचा सर्वांचाच दृष्टिकोन बदलला आहे. यामध्ये आशुतोष आपल्या आईवर प्रेम करतो या बातमीने इशाही थक्क झाली आहे. त्यामुळे आजच्या भागात इशा आशुतोषला भेटण्यासाठी त्याच्या ऑफिसवर जाणार आहे.
यावेळी इशा आशुतोषला आपले बाबा किती चांगले आहेत हे पटवून देण्याचा प्रयत्न करणार आहे. तसेच ती आई आणि तुम्ही लग्न करणार आहात का असे आशुतोषला विचारणार आहे. यावर आशुतोष सांगणार आहे की, तुझी आई आणि मी फक्त एक चांगले मित्र आहोत. अरुंधतीचे सर्वात जास्त प्रेम तिच्या मुलांवरच आहे. त्यामुळे आम्ही लग्न करणार नाही. यावर इशा म्हणते मग तुम्ही घरात जे काही म्हणला ते नक्की काय होत?
https://www.facebook.com/140231176680/posts/10158283666341681/?flite=scwspnss
यावर आशुतोष म्हणतो, मी जे काही म्हणलो आहे ते फक्त माझ्या बाजूने आहे. माझं प्रेम आहे अरुंधतीवर पण ती मला फक्त मित्र म्हणूनच बघते. या सर्व चर्चेनंतर आशुतोष इशासाठी मैत्रीचा हात पुढे करतो. इशाही तुम्ही खूप चांगले आहात असे म्हणत आशुतोषची मैत्री स्वीकारते. यानंतर दोघे ही अरुधंतीकडे जातात.
तिथे गेल्यांनतर इशा आईला मिठी मारते. इकडे इशा अरुंधतीला भेटायला गेल्याची बातमी कळताच अनिरुद्ध चांगलाच संतापतो. आता सगळे घरच तिच्याकडे जाईल असे अनिरुद्ध म्हणतो. दरम्यान या सर्व घडामोडींमध्ये अप्पांनी, यशने अरुंधतीला स्वतंत्र निर्णय घेण्यासाठी पूर्ण पाठिंबा दिला आहे. त्यामुळे अरुंधती आशुतोषच्या प्रेमाचा स्वीकार करेल का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
सध्या अरुंधती आपल्या पहिल्या प्रेस कॉन्फरन्सची तयारी करण्यामध्ये व्यस्थ आहे. संजनचा ही हा पहिला इव्हेंट आहे. परंतु तरी देखील ती अरुंधतीला मागे खेचण्यासाठी प्रयत्न करत आहे. यशही या इव्हेंटमध्ये परफॉर्मस् सादर करणार आहे. दरम्यान पुढील भागात माई संजनाला पुरणपोळ्या बनवायला लावणार आहे. संजनाला स्वयंपाक येत नसल्यामुळे तिची सर्वांसमोर नाचक्की होणार आहे.