Share

आश्रम 4 चा बाबा निराला बनण्यासाठी बॉबी देओलने ठेवली ‘ही’ मोठी अट, वाचून हैराण व्हाल

‘आश्रम’ या प्रसिद्ध वेब सीरिजमध्ये बॉबी देओलने(Bobby Deol) बाबा निरालाची भूमिका अशा प्रकारे साकारली आहे की, लोकांना त्याच्या अभिनयावर विश्वास बसला आहे. इतर दोन सिझनप्रमाणे आश्रमचा तिसरा सिझनही सुपरहिट ठरला. (ashram-4-baba-nirala-means-bobby-deol-big-relevance-of-ashram-4-series)

‘आश्रम 3′(Ashram 3) वेब सिरीजमध्ये आश्रम 4 ची झलक दाखवण्यात आली आहे. ज्यावरून आश्रमाचा चौथा सीजन लवकरच येणार असल्याचे स्पष्ट होत आहे. पण तुम्हाला माहित आहे का की बॉबी देओलने ‘आश्रम 4’ बाबत प्रकाश झा यांच्यासमोर मोठी अट ठेवली आहे.

दिग्दर्शक प्रकाश झा(Prakash Zha) यांनी एक मोठा खुलासा केला आहे. जेव्हा प्रकाश यांना ‘आश्रम 4’बद्दल विचारण्यात आले तेव्हा मजेशीर उत्तर देताना प्रकाश झा म्हणाले- ‘बाबा जाने मन की बात’.

यानंतर बॉबी देओल म्हणाला- ‘मला सीझन बनवायचे आहे आणि बनवत राहायचे आहे.’ तेव्हा प्रकाश झा म्हणाले की, चौथ्या सीझनबद्दल आधी तिसर्‍या सीझनमध्ये किती ग्रोथ झाली हे पाहावे लागेल.

या वेब सिरीजचा पहिला आणि दुसरा सीझन जबरदस्त होता. अशा परिस्थितीत तिसरा सीझन अवघ्या 32 तासांत 100 मिलियन वेळा पाहिला गेला आहे. ती OTT वर सर्वात जास्त पाहिली जाणारी वेब सिरीज बनली आहे.

‘आश्रम 4’ चा(Aashram 4) टीझरही रिलीज झाला आहे. प्रकाश झा दिग्दर्शित या सिरिजच्या नव्या सीझनच्या टीझरने आता प्रेक्षकांची उत्सुकता द्विगुणित केली आहे. बॉबी देओल, चंदन रॉय, अदिती आणि त्रिधा चौधरी पुन्हा मुख्य भूमिकेत दिसत आहेत.

मनोरंजन ताज्या बातम्या

Join WhatsApp

Join Now