congress : सध्या काँग्रेसमध्ये पक्षाध्यक्ष पदाच्या निवडणुकीवरून खलबतं सुरू आहेत. काँग्रेस अध्यक्षपदासाठी उमेदवारी अर्ज करण्यास उत्सुक असणाऱ्या काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांमध्ये राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांचेही नाव चर्चेत होते. आता मात्र यावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. काँग्रेस ज्येष्ठ नेत्यांमध्ये १० जनपथ या ठिकाणी एक महत्त्वपूर्ण बैठक पार पडणार आहे.
राजस्थानमध्ये अशोक गेहलोत यांचे काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीबाबत नाव चर्चेत आल्यावर मोठी खळबळ माजली. देशभरातील काँग्रेस नेत्यांकडून अशोक गेहलोत अध्यक्षपदाच्या शर्यतीतून बाहेर पडले असल्याचे संकेत देण्यात येत आहेत. त्याला राजस्थानमधील राजकीय परिस्थिती जबाबदार असल्याचे बोलले जाते.
मागच्या तीन वर्षांपासून मुख्यमंत्री पदासाठी उत्सुक असलेले सचिन पायलट यांना मुख्यमंत्री केले जाऊ नये, यासाठी गेहलोत त्यांच्या तब्बल ९० हून अधिक समर्थक आमदारांनी राजीनामे दिले होते. त्यानंतर स्वतः अशोक गेहलोत यांनी पक्षश्रेष्ठींसमोर सचिन पायलट यांच्या नावाला सहमती दर्शवली होती. या प्रकरणामध्ये अशा प्रकारचे वेगळेच ट्विस्ट आहे.
आता अशोक गहलोत काँग्रेस अध्यक्ष पदासाठी उत्सुक आहेत. मात्र १० जनपथवर राजस्थानमधील राजकीय घडामोडींबाबत चर्चा केली जाऊ शकते. त्याचप्रमाणे काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीबाबत काही महत्त्वपूर्ण चर्चा देखील होऊ शकते, असे अंदाज वर्तवले जात आहेत.
काँग्रेस हायकमांड राजस्थानमधील सत्ता टिकवण्यासाठी अशोक गेहलोत यांचा नावावर फुली मारतील, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. त्यामुळे राष्ट्रीय पक्षाध्यक्ष पदाच्या निवडणुकीच्या शर्यतीमधून अशोक गेहलोत यांचे नाव बाहेर पडते की काय, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
मल्लिकार्जुन खरगे, मुकुल वासनिक, दिग्विजय सिंह, काँग्रेस सरचिटणीस केके वेणुगोपाल यांची नावे अध्यक्ष पदाच्या शर्यतीत पुढे असल्याची चर्चा जोर धरते आहे. तब्बल २५ वर्षानंतर गांधी कुटुंबा व्यतिरिक्त नवा अध्यक्ष काँग्रेसला मिळणार आहे. या प्रक्रियेदरम्यान आता नव्याने कोणकोणत्या गोष्टी घडतात, हे पाहावे लागेल.
महत्वाच्या बातम्या-
high court : ‘मांसाहाराची जाहिरात दिसत असेल तर टीव्ही बघणं बंद करा” जैन याचिकाकर्त्याला हायकोर्टानं फटकारलं
Cyber: सावधान! अनोळखी ठिकाणी मोबाईल चार्जिंगला लावताय? काही मिनीटात बँक खाते होईल रिकामे
madhukar pichad : मधुकर पिचडांचा गड ढासळला; २८ वर्षांची सत्ता संपुष्टात, राष्ट्रवादीने दिला धोबीपछाड