चव्हाण यांच्याही मनात ही भावना असल्याचे सांगण्यात येते आहे. नाना पटोले यांना प्रदेशाध्यक्ष पद मिळाल्यानंतर चव्हाण हे पक्षात नाराज असल्याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. अनेकदा अशोक चव्हाण यांनी आपली नाराजी स्पष्टपणे बोलून दाखवली आहे.
याचबरोबर काही दिवसांपूर्वीच विधान परिषदेच्या निवडणुकांवेळी काँग्रेसची मते फुटली होती, शिंदे सराकारच्या विश्वासदर्शक ठरावावेळीही अशोक चव्हाण आणि काही काँग्रेस आमदार गैरहजर होते. अशातच एक धक्कादायक बाब समोर आली आहे. चव्हाण यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्याची माहिती समोर आली आहे.
यामुळे राजकीय वर्तुळातील अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. चव्हाण – फडणवीस यांच्या भेटीनंतर आता राज्यात मोठा राजकीय भूकंप होणार असल्याच्या चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरू आहे. शिवसेनेनंतर आता महाराष्ट्र काँग्रेसमध्ये भूकंप होणार असल्याच बोललं जातं आहे.
यामुळे आता येणाऱ्या काळात राजकीय समीकरण नेमकी कशी बदलतात? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. नव्या सरकारचा पहिल्या टप्प्यातील मंत्रिमंडळाचा विस्तार झाला असून दुसऱ्या टप्प्यातील विस्तार रखडला आहे. पावसाळी अधिवेशन झाल्यानंतर दुसऱ्या टप्प्यातील विस्तार होणार असल्याचं सांगण्यात येत होतं.
याच पार्श्वभूमीवर आता भाजपकडून काँग्रेसच्या आमदारांचा मोठा गट फोडण्यात येणार असल्याच बोललं जातं आहे. मिळालेल्या माहितीनुसार, कॉंग्रेसमधीलच दोन आमदारांना मंत्रिपद देणार असल्याच देखील बोललं जातं आहे. येत्या ऑक्टोबर महिन्यात मंत्रिमंडळ विस्तार होण्याची शक्यता असल्याच बोललं जातं आहे.
महत्त्वाच्या बातम्या