Politics: एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी केल्यानंतर राजकीय वातावरण तापले. त्यावेळी शिवसेनेचे दोन गट पडले. यावेळी शिवसेनेच्या पडत्या काळात आंबेडकरी विचारांची धगधगती मशाल ते उद्धव ठाकरेंच्या बहुजनवादी हिंदुत्वाच्या प्रचारक बनलेल्या नेत्या सुषमा अंधारे यांनी ठाकरे गटात प्रवेश केला. त्यानंतर त्या सतत चर्चेत राहिल्या. सुषमा अंधारे यांना भाजपने खोचक टोला लगावला आहे.
सुषमा अंधारे नेहमीच आपल्या वक्तव्यामुळे चर्चेत येत असतात. सुषमा अंधारे शिंदे गट आणि भाजपवर सातत्याने टिकास्त्र सोडत असतात. त्यामुळे नेहमीच्या आरोप प्रत्यारोपाची खेळी रंगल्याचे चित्र पाहायला मिळत. नुकताच भाजप नेते आषिश शेलार यांनी सुषमा अंधारे यांचा समाचार घेतला आहे.
आषिश शेलार म्हणाले की, स्वत:च्या पक्षाची वाताहत झाल्यानंतर दुसऱ्या पक्षात कलह निर्माण करण्यासाठी आगलावेपणा बरा नाही. त्यामुळे मी सुषमा अंधारे यांना विनंती करतो, त्यांनी त्यांचे आडनाव बदलून सुषमा आगलावे करावे.
तसेच, सुषमा अंधारे यांनी मनिषाताई यांचच्याकडे पहावे आणि आणि त्यांची काय स्थिती झाली, हे समजून घ्यावे, असा खोचक टोलाही आशिष शेलार यांनी लगावला. दरम्यान, सुषमा अंधारे यांनी शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर त्यांना उपनेतेपद देण्यात आले होते.
दरम्यान, शिवाजी पार्क येथील बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळी शुद्धीकरण करण्यात आले होते. यावरूनही आषिश शेलार सुनावले आहे. एखाद्या स्मृतीस्थळावर जाऊन वंदन करणारे मराठी माणूस ते ही मंत्री यांच्या बाबत शुद्धीकरण करण्याचा अशुद्ध विचार कसे काय सुचू शकतात? असे म्हणत आषिश शेलार यांनी प्रश्न उपस्थित केला. यावर आता ठाकरे गटातून काय प्रतिक्रिया मिळते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
महत्वाच्या बातम्या –
जर तुझा बाप सुषमा अंधारेचा पती नसता तर तर मुख्यमंत्र्यांनी त्याला स्टेजवर बोलावलं असतं का?
उद्धव ठाकरेंवर कडवी टिका करणाऱ्या डॅशींग नेत्या सुषमा अंधारे यांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश