शिवसेना खासदार संजय राऊत यांनी थेट उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांना पत्र लिहिलं आहे. नायडू यांना लिहिलेल्या पत्रात राऊत यांनी भाजपवर गंभीर आरोप केले. दरम्यान, संजय राऊत (sanjay raut) यांच्या गंभीर आरोपांमुळे राज्यातील राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. (ashish shelar strongly criticized to shiv sena leader sanjay raut)
याचाच धागा पकडत भाजपा आमदार आशिष शेलार यांनी मुंबई आज पत्रकार परिषद घेऊन राऊत यांच्यावर निशाणा साधला आहे. शिवसेना खासदार संजय राऊत हे मानसिक रुग्णतेच्या पर्मोच्च स्थानावर पोहचले आहेत, अशा शब्दात शेलार यांनी राऊत यांच्यावर पलटवार केला आहे.
पुढे बोलताना शेलार म्हणाले, ‘महाविकास आघाडीच्या एकाही नेत्याची साथ नसल्याने ते एकाकी पडले आहेत. ईडीकडून चौकशीचा ससेमिरा सुरू आहे. त्यामुळे राऊत यांचा थयथयाट सुरू असल्याचे शेलार यांनी म्हटले. राऊत मागील सात वर्षांपासून भाजपला बदनाम करत असल्याचे शेलार म्हणाले.
दरम्यान, याच मुद्यावरुन भाजपा आमदार अमित साटम (amit satam) यांनी संजय राऊतांवर जोरदार निशाणा साधला आहे. ‘संजय राऊत मुंबई ही तुमची जहागिर नाही. महाविकास आघाडी सरकारमध्ये आपली जागा फक्त खलिता वाहणाऱ्या काशिदाची आहे,’ अशा शब्दात साटम यांनी संजय राऊतांवर पलटवार केला आहे.
तसेच ते म्हणले, ‘घरात घुसायची भाषा करता पण स्वत:च्या घरात तुमची किती किंमत आहे हे आम्हाला चांगलं माहित आहे. भ्रष्टाचार करायचा, मग तो बाहेर काढणाऱ्या किरीट भाईंवरती भेकड हल्ले करायचे. प्रविण राऊत यांना अटक झाल्यानंतर तुमचं मानसिक संतुलन बिघडलं आहे हे आम्हाला ठाऊक आहे.’
पुढे बोलताना साटम म्हणले, ‘हुल्लडबाजी ही भाजपची संस्कृती नाही. पण तुमच्याच भाषेत बोलायचं तर एकदा प्रशासनाला बाजूला ठेवा, वेळ आणि जागा सांगा आणि मग भाजप कार्यकर्त्यांच्या मनगटातील ताकद काय आहे ते पाहायला या,’ अशा शब्दात साटम यांनी राऊत यांना इशारा दिला आहे.
महत्त्वाच्या बातम्या
…तो पर्यंत मी लग्न करणार नाही; निवडणूकीपूर्वीच नवज्योत सिद्धूंच्या मुलीची भीमप्रतिज्ञा
किरीट सोमय्या भडकले; “संजय राऊतांना एवढी मस्ती, गुर्मी आली असेल तर…”
आपल्या सर्वांचा लाडका ‘शक्तिमान’ पुन्हा येणार रुपेरी पडद्यावर, टीझर पाहून चाहत्यांची उत्सुकता शिगेला
राज्यमंत्री बच्चू कडूंचा पाय खोलात! न्यायालयाने सुनावली 2 महिने सश्रम कारावासाची शिक्षा