ashish shelar : राजकीय वातावरण तापलेलं असतानाच काल शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी भर सभेत भाजपला लक्ष केलं. मर्द असाल तर मुंबई पालिकेची निवडणूक महिनाभरत घेऊन दाखवा, असं थेट आव्हान उद्धव ठाकरेंनी सत्ताधारी नेत्यांना दिलं. यावरून आता नवीन वादाला तोंड फुटले आहे.
उद्धव ठाकरेंच्या या आव्हानाला आता भाजपकडून प्रत्युत्तर मिळालं आहे. तुमचे सुपुत्र आदित्य ठाकरे आमच्या मतांवर वरळीचा आमदार म्हणून निवडून आला आहे, असे म्हणत मुंबई भाजपाध्यक्ष आशिष शेलार यांनी उद्धव ठाकरेंना प्रत्युत्तर दिलं आहे. यामुळे ठाकरे गट आणि भाजपात आणखीनच वादाची ठिणगी पडली आहे.
माध्यमांशी बोलताना आशिष शेलार म्हणाले की, आदित्य ठाकरे आमच्या मतांवर वरळीचा आमदार म्हणून निवडून आला आहे. त्यामुळे शिवसेना मर्दांची असेल तर अगोदर पेंग्विनसेना प्रमुखाला राजीनामा द्यायला सांगा,’ असं थेट आव्हान शेलार यांनी दिलं आहे. यामुळे आता उद्धव ठाकरे हे आव्हान स्वीकारणार का? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
पुढे बोलताना शेलार म्हणाले, ‘दुसऱ्यासोबत सरकार बनवायचं आणि ते पडलं की विद्यमान सरकार बरखास्त करुन दाखवा म्हणून आव्हान द्यायचं, ही पाटलीनीची भाषा योग्य नव्हे, असे शेलार म्हणाले. तसेच आव्हान द्यायचंच असेल तर लुकड्या तुकड्या महाविकास आघाडीबरोबर जाऊन आमच्याविरोधात निवडणूक लढा आणि आमच्याशी दोन हात करा.’
दरम्यान, शेलार यांनी ट्विटर अकाऊंटवरून याबाबत एक ट्विट देखील केलं आहे. ‘पेंग्विन सेनेच्या हाती धुपाटणे यायची वेळ आली.nहसीना पारकर सोबत देवाणघेवाण, कसाबला बिर्याणी, याकूबच्या कबरीवर रोषणाई करणारे आता म्हणे, भाजपाचा कोथळा काढणार? वा रे वा!” अशी टीका केली आहे.
काल उद्धव ठाकरेंनी सभेदरम्यान भाजपसोबतच शिंदे गटाला देखील लक्ष्य केलं. यावरून आता राजकारण तापलं आहे. भाजपकडून प्रत्युत्तर येण्यास सुरुवात झाली आहे. नुकतच आशिष शेलार यांनी उद्धव ठाकरेंवर पलटवार केला आहे. आता ठाकरे गटाकडून काय प्रतिक्रिया येणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
महत्वाच्या बातम्या
politics : नाशिकमध्ये शिवसेनेला मोठा हादरा, तब्बल १७ पेक्षा जास्त माजी नगरसेवक शिंदे गटाच्या वाटेवर
Shivsena : शिंदे गटाचा खोटारडेपणा आला समोर, आठ राज्यांच्या शिवसेनाप्रमुखांची ठाकरेंच्या सभेला हजेरी
Banglore : इन्स्टावर न्युड फोटो शेअर केल्याने भडकली गर्लफ्रेंड, मित्रांसोबत मिळून ‘असा’ केला बॉयफ्रेंडचा खून
Health : हृद्यविकाराचा झटका सकाळीच का येतो? कोणाला याचा धोका जास्त असतो? वाचा आणि सावध व्हा!