Share

VIDEO: कोच आशिष नेहरा हार्दिक पांड्याला म्हणाला खोटारडा, जाणून घ्या मुलाखतीदरम्यान काय घडलं?

गुजरात टायटन्सने त्यांच्या डेब्यूच्या सिजनमध्येही विजेतेपद पटकावून इतिहास रचला आहे. संघाच्या या कामगिरीचे सर्व श्रेय कर्णधार हार्दिक पंड्या आणि प्रशिक्षक आशिष के यांना दिले जात आहे. गुजरात संघाने या स्पर्धेत सुरुवातीपासूनच वर्चस्व राखले. हार्दिकने आपल्या कर्णधारपदाची झलक दाखवून दिली.(ashish-nehra-calls-captain-hardik-pandya-a-liar)

मात्र, हार्दिक या विजयासाठी प्रशिक्षक आणि सहकारी खेळाडूंना जबाबदार धरत आहे. सामन्यानंतर पंड्याने(Captain Hardik Pandya) नेहरा यांनी संघाला कसे हाताळले हे सांगितले. पण नेहरा यांनी हार्दिक खोटे बोलत असल्याचे सांगितले.

वास्तविक, फायनल जिंकल्यानंतर गुजरात संघाने चांगलीच धमाल केली होती. सामना जिंकल्यानंतर मधल्या मैदानात बांधलेल्या स्टेजवर बसून नेहरा आणि पांड्याने एकमेकांची मुलाखत घेतली. यादरम्यान हार्दिकने नेहरा यांची जोरदार प्रशंसा केली, त्यानंतर नेहरा म्हणाले की, तो खोटे बोलत आहे.

https://twitter.com/IPL/status/1531123234694782976?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1531123234694782976%7Ctwgr%5E%7Ctwcon%5Es1_c10&ref_url=https%3A%2F%2Fcdn.embedly.com%2Fwidgets%2Fmedia.html%3Ftype%3Dtext2Fhtmlkey%3Dcb7145f1731b4c328f8e4d2201854ceaschema%3Dtwitterurl%3Dhttps3A%2F%2Ftwitter.com%2Fipl%2Fstatus%2F1531123234694782976image%3Dhttps3A%2F%2Fabs.twimg.com%2Ferrors%2Flogo46x38.png

स्टार स्पोर्ट्सने एक मुलाखत शेअर केली आहे. ज्यामध्ये हार्दिक आणि नेहरा दोघेही एकमेकांशी बोलत आहेत. सर्वात आधी नेहरा यांनी विचारले, कशी फिलिंग आहे पंड्या? यावर हार्दिक म्हणाला, ‘खूप छान, पहिल्याच सीझनमध्ये सिक्स मारला. यापेक्षा अभिमान काय असू शकतो?

पुढे, हार्दिकने नेहरा(Ashish K Nehra) यांना विचारले, तुम्हाला कसे वाटते? आयपीएल ट्रॉफी जिंकणारे तुम्ही पहिले भारतीय प्रशिक्षक आहात. यावर नेहरा म्हणाले की मला हे माहित नाही, पण योगायोगाने घडले आहे. पण फिलिंग चांगली आहे कारण तुझ्या नेतृत्वाखाली संघाने चांगली कामगिरी केली.

हार्दिक पांड्या पुढे म्हणाला, हा विजय आशिष नेहरा यांना जातो कारण त्यांनी प्रत्येक खेळाडूला खूप मेहनत करायला लावली. प्रत्येक फलंदाज, गोलंदाजाकडे लक्ष दिले गेले. प्रत्येक खेळाडूने सरावानंतर विचार केला की तो क्रिझवर जाऊन बॅटच्या मधोमध शॉट मारेल. यावर आशिष नेहरा म्हणाले की हार्दिक पांड्या खोटे बोलत आहे.

खेळ ताज्या बातम्या

Join WhatsApp

Join Now