सर्वत्र राज्यसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले आहेत. सर्व पक्षांनी उमेदवारांची नावे जाहीर केली आहे. कॉंग्रेसने देखील राज्यसभा निवडणुकीसाठी उमेदवारांच्या नावांची घोषणा केली आहे. नावांची घोषणा करताच कॉंग्रेसच्या गोटातून नाराजीनाट्याच्या बातम्या समोर येऊ लागल्या आहे.
नुकतीच काँग्रेस पक्षाने देशातील विविध राज्यांमधून पक्षाच्या राज्यसभा उमेदवारांची यादी जाहीर केली. उमेदवारांची यादी जाहीर केल्यानंतर काँग्रेसमधील काही इच्छुकांनी तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली आहे. माजी आमदार डॉ. अशिष देशमुख यांनी काँग्रेस प्रदेश महासचिव पदाचा राजीनामा देण्याचं जाहीर केलं.
यामुळे कॉंग्रेसच्या गोटात खळबळ उडाली आहे. उत्तर प्रदेश विधानसभेच्या निवडणुकीत डिपॉझिट जप्त झालेल्या इम्रान खान उर्फ प्रतापगडी यांना काँग्रेसने महाराष्ट्रातून राज्यसभेची उमेदवारी दिल्याबद्दल देशमुख यांनी नाराज व्यक्त केली. ते याबाबत माध्यमांशी बोलत होते.
यावेळी बोलताना देशमुख यांनी आपल्या काँग्रेस प्रदेश महासचिव पदाचा राजीनामा देण्याचं जाहीर केलं. यावेळी पुढे बोलताना देशमुख म्हणाले, ‘उत्तर प्रदेशातून काँग्रेसचे दोन आमदार निवडून आले. अशा राज्यातून प्रतापगडी, राजीव शुक्ला आणि प्रमोद तिवारी अशा तीन नेत्यांना राज्यसभेवर पाठवणे हे कितपत योग्य आहे असा सवाल देशमुख यांनी उपस्थित केला.’
दरम्यान, अभिनेत्री-काँग्रेस नेत्या नगमा यांनी सोनिया गांधींनी शब्द पूर्ण केला नसल्याचा आरोप केला आहे. उमेदवारी न मिळाल्यामुळे नाराज असलेल्या नगमा आपल्या ट्विटमध्ये म्हणतात, ‘मी २००३-०४ साली काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या सांगण्यावरून काँग्रेस पक्षात प्रवेश केला होता. तेव्हा सोनिया गांधी यांनी स्वतः मला राज्यसभेचं आश्वासन दिलं होतं.’
पुढे त्या आपल्या ट्विटमध्ये म्हणतात, ‘सोनिया गांधी यांनी आश्वासन दिलं होतं, त्यावेळी काँग्रेस पक्ष सत्तेतही नव्हता. आता या गोष्टीला १८ वर्षे झालेत मात्र त्यांना अद्याप एकही संधी सापडलेली नाही. इमरान यांना महाराष्ट्रातून राज्यसभेवर घेण्यात आलं. मी पात्र नाही का असा माझा सवाल आहे.”
महत्त्वाच्या बातम्या
राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंमध्ये संजय राऊतांनी आग लागवली; राणेंचा राऊतांवर गंभीर आरोप
बॉलिवूडला टक्कर! ‘सरसेनापती हंबीरराव’ चित्रपटाने रचला इतिहास, तीन दिवसांत कमावले तब्बल ‘इतके’ कोटी
IPS होऊनही असमाधानी, ओंकार पुन्हा परीक्षेला बसला अन् …; मुलाचं यश भावून आईही भावुक झाली
लेकीच्या लग्नात हुंडा द्यावा लागू नये म्हणून एका पित्याने ‘असा’ रचला कट; वाचून बसेल जबर धक्का