शुक्रवारी रात्री मातोश्री परिसरात काही शिवसैनिकांनी भाजप नेते मोहित कंबोज यांच्या गाडीवर हल्ला केला होता. यावेळी उपस्थित असलेल्या पोलिसांनी हस्तक्षेप करत शिवसैनिकांना रोखण्याचा प्रयत्न केला. मातोश्री जवळ भाजप(BJP) नेते मोहित कंबोज फोटो काढत होते. यावेळी मोहित कंबोज यांच्याकडून मातोश्री परिसराची रेकी केली जात आहे, असा संशय शिवसैनिकांना आला.(ashilsh shailar statement on mohit kambhoj car attack)
त्यातून शिवसैनिकांनी भाजप नेते मोहित कंबोज यांच्या गाडीवर हल्ला केला असल्याची माहिती मिळत आहे. या घटनेमुळे राजकीय वर्तुळात वातावरण चांगलंच तापलं आहे. भाजपने या घटनेचा निषेध करत शिवसेनेवर जोरदार टीका केली आहे. या ठोकशाहीला ठोकशाहीनेच उत्तर देऊ, असा हल्लाबोल भाजप आमदार आशिष शेलार यांनी केला आहे.
पत्रकार परिषदेत भाजप आमदार आशिष शेलार यांनी शिवसेनेवर शाब्दिक हल्ला चढवला आहे. भाजप आमदार आशिष शेलार म्हणाले की, “भाजपचा पोलखोल हा कार्यक्रम अधिकृत परवानग्या घेऊन मैदानांमध्ये, रस्त्यावर होत आहे. लोकशाही मार्गाने चाललेल्या या कार्यक्रमावर एखादी व्यक्ती हल्ला करते हे नामर्दपणाचे लक्षण आहे. शिवसेनेने हा दंगेखोरपणा थांबवावा”, असे भाजप आमदार आशिष शेलार म्हणाले आहेत.
“मोहित कंभोज एका गाडीने जात होते. एकट्या व्यक्तीला बघून २५ लोकांनी एकत्र येत झुंडबळी घेण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी झाला. आम्हाला कायदा हातात घ्यायचा नाही. पोलखोलचे कार्यक्रम थांबणार नाहीत. पण एकटे जाणाऱ्या व्यक्तीच्या गाडीवर २५ लोक हल्ला करत असतील तर तुम्ही सुद्धा कधीतरी गाडीने एकटे जाणार आहात हे लक्षात ठेवा”, असे देखील भाजप आमदार आशिष शेलार म्हणाले.
भाजप आमदार आशिष शेलार पुढे म्हणाले की, “जशास तसे उत्तर देण्यासाठी आम्ही समर्थ आहोत. पण कायद्याचा चौकटीत राहून पोलखोल अभियन करण्याची आमची भूमिका आहे. लोकशाहीला लोकशाहीने आणि ठोकशाहीला ठोकशाहीनेच उत्तर देऊ”, असे हल्लाबोल भाजप आमदार आशिष शेलार यांनी केला आहे.
मोहित कंबोज यांच्या गाडीवर शिवसैनिकांनी केलेल्या हल्ल्यावर भाजप नेते अतुल भातखळकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. मोहित कंबोज जर मातोश्रीची रेकी करायला आले होते, तर मुंबई पोलीस झोपले होते का, असा सवाल अतुल भातखळकर यांनी उपस्थित केला आहे. विरोधी पक्षनेते आणि भाजप आमदार प्रवीण दरेकर यांनी या घटनेचा निषेध केला आहे.
महत्वाच्या बातम्या :-
दोन्ही लाजिरवाणे विक्रम बंगलोरच्याच नावावर, आज पुन्हा फक्त 68 धावांवर झाले ऑलआऊट
…अन्यथा मी स्वत: राणांना बाहेर काढण्यासाठी जाईल; नारायण राणेंनी दिली पहिली प्रतिक्रिया
सत्तेचा इतका माज? इतकी दंडुकेशाही?, राणा दाम्पत्याच्या अटकेवर फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया