सुप्रीम कोर्टात सध्या शिंदे गट आणि शिवसेनेतील संघर्ष सुरू आहे. एकंदरीत यामध्ये महाविकास आघाडीचीही महत्वाची भूमिका आहे. शिवसेना कोणाची यावर सध्या न्यायालयात वाद सुरू आहे. तसेच राज्यपालांनी या सर्व काळात जे निर्णय घेतले त्यावरही महाविकास आघाडीच्या वकीलांनी आक्षेप घेतला आहे.
विधानसभा अध्यक्षाची जी निवडणूक झाली त्यामध्ये राज्यपालांनी जी भूमिका घेतली होती त्यावर महाविकास आघाडीच्या नेत्यांनी खुप टीका केली होती. ठाकरे सरकारच्या सत्तास्थापनेपासून ते पायउतार होईपर्यंत राज्यपालांमध्ये आणि महाविकास आघाडीमध्ये खुप संघर्ष पाहायला मिळाला होता.
हा संघर्ष आता कोर्टात पाहायला मिळत आहे. कायदेतज्ञ असीम सरोदे यांनी यावर भाष्य केले आहे. भारतीय संविधानाने राज्यपालांना जे अधिकार दिले आहेत यावर त्यांनी विश्लेषण केलं आहे. त्यांनी राज्यपालांच्या भूमिकेवर आक्षेप नोंदवला आहे. ते म्हणाले की, मुख्यमंत्री आणि मंत्रीमंडळाच्या सल्ल्याने राज्यपालांनी काम करावे, असं राज्यघटनेत लिहीलं आहे.
भगतसिंग कोश्यारी हे बऱ्याचदा त्यांच्याबाहेर येऊन काम करत आहेत. राज्यपालांच्या अशा वागणुकीचा हिशोब झाला पाहिजे. आपण एखाद्या व्यक्तींच्या कामाचे ऑडिट करतो, तसं राज्यपालांच्या कामाचे ऑडिट झाले पाहिजे. पुढे ते म्हणाले की, दहाव्या कलमानुसार पक्षातून बाहेर पडलेल्यांना वेगळा गट दिसला पाहिजे.
येथे आपल्याला विधीमंंडळात फुट पडलेली दिसते मात्र ही फुट संघटनेत पडलेली दिसत नाही. त्यामुळे हा प्रश्न फारच गुंतागुतीचा आहे. शिंदे गट हा कुठल्या पक्षात विलीन झालेला नाही, त्यामुळे त्यांच्यावर अपात्रतेची टांगती तलवार आहे. फक्त १६ आमदार नाही तर पुर्ण ३८ आमदार अपात्र ठरू शकतात, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.
सरकार स्थापन झाले आहे हे कायदेशीर आहे की बेकायदेशीर आहे हे ठरलं पाहिजे. एकनाथ शिंदेंनी तारेवरच कसरत ओढवून घेतली आहे. त्यांचे राजकीय भविष्य नाही तर राज्य घटनेचा पुढचा प्रवास कसा राहिल, याचा याबाबतचा हा अंत्यत महत्वाचा निर्णय असणार आहे.
महत्वाच्या बातम्या
टोलमाफी संदर्भात नितीन गडकरींची लोकसभेत मोठी घोषणा; शहरातील टोल माफ होणार
Rahul gandhi: राहुल गांधींनी स्विकारला लिंगायत पंथ, मठातील संतांनी दिला पंतप्रधान होण्याचा आशिर्वाद
Sanjay Raut: ‘मला ह्रदयविकाराचा त्रास, छोट्या खोलीत ठेवल्याने तिथे पुरेशी हवा येत नाही, श्वास घेण्यास त्रास होतो’
Rape Case: बलात्कारातून जन्मलेल्या मुलाने २७ वर्षांनी शोधली स्वतःची खरी आई; जन्मदात्या बापाचाही घेतला सूड