asaduddin owaisis : कर्नाटकसह देशात हिजाबवरून वादंग सुरू आहे. हे प्रकरण थेट उच्च न्यायालयात देखील पोहचलं आहे. गेल्या अनेक दिवसावसांपासून कर्नाटकमधील एका महाविद्यालयात सुरू झालेला हिजाब वाद संपूर्ण देशात पसरला. या प्रकरणाचे अनेक पडसाद देखील सर्वत्र उमटले.
विशेष बाब म्हणजे, यावरून राज्यातील राजकारण देखील चांगलच तापलेलं पाहायला मिळालं. याच प्रकरणावरून राज्यात आरोप – प्रत्यारोपांचे सत्र देखील रंगले. अजूनही कर्नाटकातील हिजाबचा वाद संपलेला नाही. उच्च न्यायालयाच्या पूर्ण खंडपीठाने हिजाब घालून कॉलेजमध्ये येण्यावर घातलेली बंदी कायम ठेवली आहे.
असं असतानाच आता AIMIM पक्षाचे अध्यक्ष असदुद्दीन ओवैसी यांनी एक मोठं व्यक्तव्य केलं आहे. ‘एक दिवस हिजाब घातलेली मुस्लीम महिला भारताची पंतप्रधान होईल,’ असं मोठं वक्तव्य असदुद्दीन ओवैसी यांनी केलं आहे. यामुळे आता नवीन वादाला तोंड फुटणार असल्याचं बोललं जातं आहे.
कर्नाटकातील हिजाब प्रकरण ताजे असतानाच आता असदुद्दीन ओवैसी यांनी केलेलं वक्तव्य चर्चेचा विषय बनला आहे. अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. गुरुवारी एका सभेत बोलताना ओवैसी यांनी एक दिवस हिजाब घातलेली मुस्लीम महिला भारताची पंतप्रधान होईल, असं म्हंटलं आहे.
ओवैसी म्हणाले, “एक ना एक दिवस हिजाब घातलेली मुस्लीम महिला भारताची पंतप्रधान होईल, असं मी अनेकवेळा सांगितलं आहे. पण असं मी बोलल्यानंतर अनेकांच्या पोटात दुखतं, हृदयात वेदना होतात. रात्री झोप येत नाही.” “मात्र एखादी मुस्लीम महिला पंतप्रधान होत असेल, तर यात वाईट वाटण्याचं कारण काय,” असा संतप्त सवाल ओवैसी यांनी यावेळी उपस्थित केला.
दरम्यान, सध्या सुप्रीम कोर्टात कर्नाटकातील हिजाब वाद प्रकरणात सुनावणी सुरू आहे. हिजाबवर शैक्षणिक संस्थांमध्ये बंदी असावी की नसावी, यासंदर्भात सुप्रीम कोर्टातील द्वीसदस्यीय खंडपीठात एकमत न झाल्याने आता हे प्रकरण मोठ्या खंडपीठाकडे पाठवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
महत्वाच्या बातम्या-
Nilesh Lanke : “आमदार निलेश लंकेंनी कोरोना सेंटरच्या नावाखाली अफाट माया जमवली, आता त्या पैशातून…”
Umran Malik: उमरान मलिकला संघात न घेतल्याने ब्रेट लीने निवडकर्त्यांना लगावला टोला, म्हणाला, जगातील सर्वोत्तम..
Urvashi Rautela: ऋषभ पंतच्या नावाने सतत ट्रोल झाल्याने उर्वशी रौतेला झाली दुखी, म्हणाली, माझी कोणालाच…






