Share

औवैसींची गुगली, भाजपला राज्यसभेत हरवण्यासाठी मविआला दिली ‘ही’ ऑफर,चर्चांना उधाण

owisi
सध्या राज्यात निवडणुकांचे वारे वाहू लागले आहे. नेतेमंडळी दौरे, बैठका, सभांमध्ये व्यस्त आहेत. निवडणुकांच्या तोंडावर आरोप – प्रत्यारोपांचे सत्र रंगले आहे. तर आता खऱ्या अर्थाने राज्यसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. राज्यसभेच्या महाराष्ट्रातील सहा जागा लवकरच रिक्त होत आहेत.

या जागांसाठी १० जून रोजी निवडणूक होणार आहे. अशातच राज्यसभा निवडणुकीत एमआयएमचे आमदार मविआला मतदान करणार की भाजपला मतदान करणार? यावर असदुद्दीन ओवैसी यांची प्रतिक्रिया समोर आली आहे. असदुद्दीन ओवैसी यांनी एक गुगली टाकली आहे.

यामुळे आता राज्यसभा निवडणुकीतील गंमत आणखीच वाढणार असल्याच बोललं जातं आहे. भाजपाला पराभूत करण्यासाठी महाविकास आघाडीने आम्हाला मदत मागावी असं आवाहन ओवेसी यांनी केले आहे. सध्या ओवैसी नांदेडमध्ये असून आज ते लातूर येथील एका सभेला उपस्थित राहणार आहे.

तत्पुर्वी ओवैसी यांनी माध्यमांशी संवाद सांधला. यावेळी बोलताना त्यांनी राज्यसभा निवडणुकीबाबत भाष्य केलं. ते म्हणाले, राज्यसभेच्या निवडणुकीसंदर्भात महाविकासाठी कुणीही आमच्याशी संपर्क केलेला नाहीये. तसेच आमच्या आमदारासोबत संपर्कही केलेला नाहीये.’

पुढे बोलताना ते म्हणाले, ‘जर महाविकास आघाडीला मतांची आवश्यकता आहे तर त्यांनी एमआयएमसोबत संपर्क साधावा. जर आवश्यकता नसेल तर काही हरकत नाही. आम्हाला जो निर्णय घ्यायचा आहे तो आम्ही घेऊ,’ असं असदुद्दीन ओवैसींनी यांनी यावेळी बोलताना स्पष्टच सांगितलं आहे.

दरम्यान,  महाविकास आघाडीने संपर्क केला तर एमआयएम राज्यसभेसाठी त्यांना मतदान करणार असल्याचे ओवेसी म्हणाले. तर दुसरीकडे निवडणूक जिंकण्यासाठी सत्ताधारी आणि विरोधक दोघांकडून मतांची जुळवाजुळव करण्यात येत आहे. अशातच ओवैसींनी ही गुगली टाकली आहे.

महत्त्वाच्या बातम्या 
`
इतर ताज्या बातम्या राजकारण राज्य

Join WhatsApp

Join Now