अण्णा हजारे (Aanna Hajare): समाजसेवक अण्णा हजारे यांना दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचे राजकीय गुरू म्हणून ओळखले जाते. अण्णा हजारे यांनी दिल्ली सरकारच्या दारू धोरणावर निशाणा साधला आहे. त्यांनी अरविंद केजरीवाल यांना पत्र लिहून दिल्लीतील दारूची दुकाने बंद करण्याची विनंती केली आहे. दारूची दुकाने सुरू करण्याबाबत त्यांनी केजरीवाल यांच्या वर्तनावरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.
अण्णा हजारे दिल्लीत भ्रष्टाचाराविरोधात आंदोलन करणाऱ्यापैकी एक आहे. त्यांनी मुख्यमंत्री केजरीवाल यांना पत्र लिहून दिल्लीचे अबकारी धोरण आणि दारू घोटाळ्यावर निशाणा साधला आहे. तसेच त्यांना दारूच्या समस्यांबाबत सूचना दिल्या असून दारूची दुकाने तातडीने बंद करण्यास सांगितले आहे. अरविंद केजरीवाल यांना पत्र लिहिताना अण्णांनी लिहिले की, तुमच्या बोलण्यात आणि वागण्यात फरक आहे..
मात्र राजकारणात गेल्यावर आणि मुख्यमंत्री झाल्यानंतर आदर्श विचारसरणीचा विसर पडला आहे, असे वाटते. अण्णांनी आपल्या पत्रात लिहिले की, ‘जशी दारूची नशा असते, तशीच सत्तेची नशा असते. तुम्हालाही सत्तेची नशा चढलेली दिसतेय. दिल्ली सरकारच्या अबकारी धोरणावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत अण्णा हजारे म्हणाले, तुमच्या सरकारने नवीन दारू धोरण तयार केले आहे.
तुमचे अबकारी धोरण मद्य विक्री आणि सेवनास प्रोत्साहन देत असल्याचे दिसते. गल्लीबोळात दारूची दुकाने उघडली जात आहेत. त्यामुळे भ्रष्टाचाराला चालना मिळू शकते. हे जनतेच्या हिताचे नाही. पुढे त्यांनी लिहले की, त्यांना दिल्लीत महाराष्ट्रासारखे धोरण अपेक्षित होते, पण ‘आप’ने तसे केले नाही. सत्तेसाठी पैशाच्या वर्तुळात आणि पैशासाठी सत्तेच्या वर्तुळात जनता अडकलेली दिसते.
मोठ्या चळवळीतून बाहेर पडलेल्या पक्षाला ते शोभत नाही. अण्णांनी पत्रात लिहिले आहे की, ‘स्वराज’ या पुस्तकात तुम्ही अतिशय आदर्शवादी गोष्टी लिहिल्या होत्या. तेव्हा तुमच्याकडून खूप अपेक्षा होत्या, असे म्हणत त्यांनी दारू विक्री बंद करण्याची विनंती केली आहे.
महत्वाच्या बातम्या
Accident: अंगावर काटा आणणारा अपघात; कारच्या धडकेत चिमुकल्यासह महिला पोलीस आईही ठार
BJP : भाजप मनसेकडून एकमेकांवर कौतूकाचा वर्षाव; दोघांच्या युतीचे स्पष्ट संकेत
Amit Shah : तुमच्या मुलाऐवजी बिगर भाजप नेत्याने ‘ते’ कृत्य केले असते तर…; अभिनेत्याचा अमित शहांना सवाल
Amit Shah : तुमच्या मुलाऐवजी बिगर भाजप नेत्याने ‘ते’ कृत्य केले असते तर…; अभिनेत्याचा अमित शहांना सवाल