Share

World Cup : ट्वेंटी वर्ल्डकपसाठी संघ जाहीर होताच धोनीच्या ‘या’ खास खेळाडूने अचानक जाहीर केली निवृत्ती; चाहत्यांना धक्का

भारतीय क्रिकेटपटू ईश्वर पांडेने आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा केल्याची घोषणा केली आहे. बऱ्याच दिवसांपासून मुख्य प्रवाहात संधीची वाट पाहत असतानाच, ईश्वर पांडेने क्रिकेटमधून निवृत्तीचा निर्णय घेतला आहे. इन्स्टाग्रामवरून त्याने आपल्या निवृत्तीची माहिती दिली आहे.

वेगवान गोलंदाज ईश्वर पांडे याने आज आंतरराष्ट्रीय आणि प्रथम श्रेणी क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. २०२२ च्या टी२० वर्ल्ड कप स्पर्धेसाठी भारतीय संघाची निवड झाल्यानंतर पांडेने निवृत्तीची घोषणा केली आहे. त्याने इन्स्टाग्रामवर निवृत्तीची माहिती दिली.

निवृत्ती घेताना ईश्वर म्हणाला की, इंग्लंड आणि न्यूझीलंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत माझा समावेश झाला, ही माझ्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे. पण देशासाठी अधिक खेळण्याची संधी मिळू शकली नाही याचेही दु:ख आहे. मी भारतीय संघातील दिग्गज खेळाडूंसोबत ड्रेसिंग रूम शेअर केली, हे माझ्यासाठी स्वप्नासारखे होते, क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकरविरुद्ध सामना खेळणे ही माझ्यासाठी अभिमानाची गोष्ट होती.

इन्स्टाग्रामवर निवृत्तीची घोषणा करताना त्याने लिहिले की, आज तो दिवस आला आहे आणि जड अंतःकरणाने मी आंतरराष्ट्रीय आणि प्रथम श्रेणी क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याचा निर्णय घेतला आहे. २००७ मध्ये मी हा अद्भुत प्रवास सुरू केला आणि तेव्हापासून मी मैदानावर आणि मैदानाबाहेर प्रत्येक क्षणाचा आनंद घेतला.

तसेच लिहिले, इंग्लंड आणि न्यूझीलंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत सामील होणे ही माझ्यासाठी अभिमानाची बाब होती. पण देशासाठी अधिक खेळण्याची संधी मिळू शकली नाही याचेही दु:ख आहे, अशी भावना ईश्वर पांडे याने व्यक्त केली.

ईश्वर पांडे यांच्याबद्दल अधिक सांगायचे झाल्यास, भारतासाठी एकही आंतरराष्ट्रीय सामना खेळला नसला तरी, २०१४ मध्ये भारतीय संघाने न्यूझीलंडचा दौरा केला तेव्हा तो त्या दौऱ्यावर टीम इंडियाचा एक भाग होता. ईश्वर त्या दौऱ्यावर एकदिवसीय आणि कसोटी संघाचा भाग होता. मात्र, संपूर्ण दौऱ्यात त्याला एकाही सामन्यात खेळण्याची संधी मिळाली नाही. मध्य प्रदेशातील रीवा जिल्ह्यातील तो पहिला आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू होता.

ईश्‍वरने देशांतर्गत क्रिकेटमध्ये ७५ प्रथम श्रेणी, ५८ लिस्ट ए आणि ७१ टी-२० सामने खेळले असून, त्याने अनुक्रमे २६३,६३ आणि ६८ विकेट घेतल्या आहेत. तो महेंद्रसिंग धोनीच्या चेन्नई सुपर किंग्ज (CSK) संघाचा भाग होता. चेन्नईच्या IPL विजेतेपदाच्या संघाचा ईश्वर भाग होता. मात्र, गेल्या तीन मोसमापासून तो आयपीएलमध्ये खेळत नाही.

२०१५ मध्ये आयपीएलमध्ये तो चेन्नई सुपर किंग्जचा महत्त्वाचा आणि नियमित भाग होता आणि धोनीनेही त्याला चांगले मार्गदर्शन केले. २०१६ च्या सुरुवातीला तो प्रसिद्धीच्या झोतात आला जेव्हा त्याने आंध्र प्रदेश विरुद्ध घरगुती T२० सामन्यात हॅट्ट्रिक घेतली. त्याने प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये ९७ विकेट घेतल्या.

खेळ इतर

Join WhatsApp

Join Now