Share

Mashaal : नवं चिन्ह मिळताच मराठवाड्यात पेटली मशाल; शिवसेना उद्धव ठाकरे गटाची विजयी सलामी

काल केंद्रीय निवडणूक आयोगाने उद्धव ठाकरे यांच्या गटाला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे असे नाव दिले. तर मशाल हे चिन्ह दिलं. आता हेच मशाल चिन्ह उद्धव ठाकरेंसाठी लकी ठरत आहे. आज उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेंसाठी मराठवाड्यातून चांगली बातमी समोर आली आहे.

स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड च्या व्यवस्थापन प्रतिनिधी पदाच्या (महाविद्यालयीन संस्थाचालक) गटातील निवडणूक ९ ऑक्टोबर २०२२ रोजी नांदेड, लातूर, परभणी, हिंगोली येथील एकूण चार केंद्रांवर अतिशय शांततेत पार पडली होती.

आज ११ ऑक्टोबर २०२२ रोजी या निवडणुकीचा निकाल लागला. लागलेल्या निकालात नवनाथ (बापू) रोहिदासजी चव्हाण यांनी प्रतिस्पर्धी गटावर मात करत दणदणीत विजय मिळवला आहे. नवनाथ (बापू) रोहीदास चव्हाण यांचा विजय म्हणजेच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचा महाराष्ट्रातील पहिला विजय आहे.

नेते नवनाथ (बापू) रोहिदास चव्हाण यांच्याबद्दल माहिती म्हणजे, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नांदेड जिल्ह्यातील युवा सेना नेते नवनाथ (बापू) रोहिदास चव्हाण हे गेली पाच वर्षे पंचायत समिती, जिल्हा नियोजन समिती सदस्य पदाची धुरा सांभाळत आपल्या कामाची चुणूक दाखवून देत आहेत.

स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड अधिसभा व्यवस्थापन गटातून नवनाथ (बापू) रोहिदास चव्हाण यांनी पुन्हा एकदा आपले मराठवाड्यात असलेले वर्चस्व सिद्ध केलं आहे. महाराष्ट्रातील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या पहिल्या विजयाची नोंद मराठवाड्यात झाली आहे.

दरम्यान, नवनाथ (बापू) चव्हाण यांच्या झालेल्या विजयाबद्दल शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे जेष्ठ नेते तथा माजी आमदार रोहिदास चव्हाण, प्रा.डॉ.पुरुषोत्तम धोंडगे,प्राचार्य अशोक गवते, नगरसेवक संभाजी पाटील यांनी अभिनंदन केलं आहे. आता येणाऱ्या काळात देखील मशाल हे चिन्ह उद्धव ठाकरेंना किती लकी ठरेल पाहावं लागेल.

राजकारण राज्य

Join WhatsApp

Join Now