राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी बुधवारी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. गेल्या काही दिवसांपासून चाकणकर राजीनामा देणार असल्याच्या चर्चांना उधाण आले होते. यानंतर अखेर त्यांनी आपला राजीनामा प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्याकडे सोपवला. त्यामुळे सुरू असलेल्या बैठकीत गोंधळ होण्यास सुरुवात झाली.
यावेळी चाकणकर यांनी सर्वांना शांत करत, महिला प्रदेशाध्यक्षपदी संधी दिल्याबद्दल मा. जयंत पाटील आणि पक्षाचे आभार मानते. माझ्याकडे महिला आयोगाचं अध्यक्षपद देखील आहे. हे संविधानिक पद असल्याने त्या पदावर निष्पक्षपातीपणे काम करणं अपेक्षित आहे. त्यामुळे मी आज राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा देत आहे” असे सांगितले.
परंतु यानंतर बैठकीत असलेल्या महिलांनी चाकणकर यांना राजीनामा न देण्यासाठी मनवण्याचा प्रयत्न केला. तसेच ‘ताई नको, ताई नको’, ‘ताई, तुम्ही राजीनामा देऊ नका’, असा सुर सर्वच महिलांनी अश्रू ढाळत चाकणकर यांच्या मागे लावला. यामुळे चाकणकर यांना देखील आपले अश्रू अनावर झाले. मात्र त्यांनी सर्व महिलांना शांत करत त्यांना समजावून सांगितले.
हा सर्व प्रकार मंत्री जयंत पाटील आणि राज्यमंत्री आदिती तटकरे स्तब्ध होऊन पाहत होते. महिलांचे चाकणकर यांच्यावरील प्रेम पाहून जयंत पाटील थक्क झाले होते. त्यांनाही अशा स्थितीत काय बोलावे हे सुचत नव्हते. दरम्यान रुपाली चाकणकर यांच्याकडे महिला आयोगाचे अध्यक्षपद आहे. काही दिवसांपूर्वीच त्यांची राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदावर नियुक्ती करण्यात आली आहे.
याकारणाने त्यांनी आपल्या महिला प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा दिला आहे. आता चाकणकरांनी राजीनामा दिल्यामुळे पुढील महिला प्रदेशाध्यक्षपद कोणाकडे जाईल याची चर्चा रंगली आहे. रुपाली चाकणकर यांनी २०१९ साली या पदाची जबाबदारी स्विकारली होती.
त्यावेळी चित्रा वाघ यांनी राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा देऊन पक्षाला रामराम ठोकला होता. यानंतर या पदाची जबाबदारी चाकणकर यांनी व्यवस्थितरित्या पार पाडली. आता चाकणकर यांनीही राजीनामा दिल्यामुळे राष्ट्रवादी या पदासाठी कोणाची नियुक्ती करेल याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.
महत्वाच्या बातम्या
मोठी बातमी! धोनीने सोडले CSK चे कर्णधारपद, आता ‘हा’ खेळाडू सांभाळणार कमान
सौंदर्यामध्ये सगळ्या अभिनेत्रींना तोड देते तेरे नाममध्ये भिकारी दिसणारी ‘ही’ अभिनेत्री, पहा फोटो
चित्रपट निर्मात्याने प्रियंका चोप्रासोबत केले होते अश्लील वर्तन; म्हणाली, माझे कपडे काढून..
धनंजय मुंडे यांनी सहा-सहा मुले आणि अनेक बायका लपवल्या आहेत’, करुणा मुंडेंचा गंभीर आरोप






