Big Boss Marathi | बिग बाॅस (Big Boss) मराठीच्या घरात सध्या एकापेक्षा एक ट्विस्ट पाहायला मिळत आहे. नुकतीच बिग बॉसने घोषणा करत या आठवड्यात दोन जण घराबाहेर पडणार असल्याचा जाहीर केलं होतं. त्यानुसार या आठवड्यात पहिल्यांदा यशश्री महसूरकर बिग बॉसच्या घराबाहेर पडली. त्यानुसार दुसरा स्पर्धक कोण असेल याकडे सर्वांचे लक्ष वेधलं होतं.
यातच रविवारच्या चावडीवर महेश मांजरेकर यांनी वेगळं सरप्राईज दिले. महेश मांजरेकर थेट बिग बॉस मराठीच्या घरात गेले आणि तिथे एलिमिनेशन कार्य पार पाडलं. यात एक टास्ट खेळण्यात आला. यामध्ये ज्याच्यासोबत महेश मांजरेकर बोलत असताना घराचे दार उघडेल तो स्पर्धक बाद होणार होता.
त्यानुसार किरण मानेसाठी बॉसचा दरवाजा उघडला. त्यावेळी अनपेक्षित एलिनिमेशन पार पडलं. पण यातच खरा मोठा ट्विस्ट होता. किरण माने दरवाजातून बाहेर तर गेले. मात्र, या खेळातून बाद झाले नाही. आता किरण मानेला एकाच सीक्रेट रूममध्ये आता ठेवण्यात आले.
आता ठेवण्यात आले सीक्रेट रुममधून किरण माने इतर स्पर्धकांवर नजर ठेवताना दिसणार आहे. त्यामुळे या कार्यक्रमात एक वेगळीच मजा आणली आहे. आता पुढे काय होणार हे पाहणं देखील म्हत्वाच ठरणार आहे. त्याचवेळी कलर्स मराठीने सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला आहे. जो सध्या चर्चेचा विषय ठरत आहे.
व्हिडिओमध्ये किरण माने नाराज असल्याचं पहायला मिळत आहे. तर किरण बेघर होताच त्याचे मित्र स्पर्धक विकास सावंतने देखील नवी चाल सुरू केली आहे. हे पाहून किरण माने दुःखी झाला आहे.
विकास अपूर्वाला म्हणतो, “अपूर्वा खूप चांगली आहे.” यावर अपूर्वा म्हणते, “तुझ्याविषयी मला नेहमीच आपुलकी वाटते. तूच माझ्याबाबत अनेक गैरसमज करून घेतले आहेस. खूप वाईट वाटतं हो. याला इथपर्यंत आपण बरोबर घेऊन आलो आहेत, असे किरण म्हणतो.
त्यानंतर विकास म्हणाला, आता माझी काळजी घ्यायला अजून एक माणूस आहे. तसेच विकासच वागण पाहून “ही तर सुरुवात आहे. पिक्चर अभी बाकी है.” असं किरण माने म्हणाला. यादरम्यान, विकास व अपूर्वा एकमेकांना घास भरवत आहेत. हे सर्व पाहून चाहते संताप व्यक्त करत आहेत. अनेकांना व्हिडिओवर कमेंट्स करत राग व्यक्त केला आहे.
महत्वाच्या बातम्या-
हॉटेलचे ३७ वर्षे जुने बिल व्हायरल; शाही पनीर अन् दाल मखनीची किंमत वाचून हैराण व्हाल
दिपक हुड्डा बाद होताच आनंदाने नाचू लागला सुर्या; साऊदीसोबत आनंद साजरा करतानाचा व्हिडीओ व्हायरल
BCCI ने रोहीतला सांगीतले ‘आम्ही ट्वेंटीसाठी नवा कर्णधार निवडतोय’; रोहित उत्तर देत म्हणाला…