Share

हीच खरी माणुसकी! कर्मचाऱ्याच्या वडिलांचे निधन झाले, सांत्वनासाठी जॅकी श्रॉफ पोहचला पुण्यात

बॉलिवूड अभिनेता जॅकी श्रॉफची एक दिलदार व्यक्ती म्हणून सोशल मिडीयावर ओळख आहे. त्याच्या या चांगूलपणामुळे जॅकीने चाहत्यांच्या मनावर कायम राज्य केले आहे. परंतु सध्या जॅकी श्रॉफ एका वेगळ्या कारणावरुन सोशल मिडीयावर चर्चेत आला आहेत. आपल्या कर्मचाऱ्याच्या वडिलांच्या निधनाची बातमी ऐकताच श्रॉफने थेट त्याचे घर गाठले आहे.

जॅकीचे मावळच्या चांदखेडमध्ये फार्महाऊस आहे. या फार्महाऊसवर सागर दिलीप गाडकवाड नावाचा व्यक्ती काम करण्यासाठी आहे. जॅकिच्या सर्व घराची जबाबदारी तोच पाहतो. परंतु मध्यंतरी या कर्मचाऱ्याच्या वडिलांचा मृत्यू झाला. त्यावेळी जॅकी दुसऱ्या कामात अडकला होता.

तिकडून आल्यानंतर जॅकीला ही निधनाची बातमी समजली. यानंतर कर्मचाऱ्याच्या कुटुंबीयांचे सांत्वन करण्यासाठी जॅकी मावळमध्ये आला. त्याने कर्मचाऱ्याच्या कुटुंबाची भेट घेतली. कर्मचाऱ्याच्या आई शेजारी बसून जॅकीने तिला धीर दिला. तसेच काही मदत लागल्याच कळवा हे सांगितले.

जॅकीच्या असे अचानक घरी येण्यामुळे घरच्यांना देखील धीर मिळाला. एक अभिनेता फक्त सांत्वन करण्यासाठी घरी आल्याचे पाहून सगळ्यांनाच आश्चर्य वाटले. सध्या जॅकीचे कुटुंबाला भेट देण्याचे फोटो सोशल मिडीयावर व्हायरल होत आहेत. जॅकी किती श्रींमत असला तरी त्यापेक्षा त्याचे मन मोठे असल्याचे या प्रसंगातून दिसून आले आहे.

https://twitter.com/rajsolan_kid/status/1508853928359710722?t=nu2kKML04JW1tdjHf6A9Vw&s=19

यापूर्वीही जॅकीने अनेकदा आदर्श प्रस्थापित करणारी कामे केली आहेत. त्यामुळे अनेकांचा तो एक आवडता अभिनेता आहे. बॉलिवूडमध्ये असे अनेक कलाकार आहेत जे सतत आपल्या मनाची श्रींमती दाखवत असतात. त्यांना प्रसिध्दी पेक्षा माणूसकीचे वागणे जास्त आवडते. जॅकी या लोकांपैकीच एक आहे.

जॅकी सध्या बॉलिवूड विश्वापासून लांब असला तरी तो सोशल मिडीयावर सक्रिय असतो. तो सतत काही ना काही अपडेट आपल्या चाहत्यांना देत असतो. चाहते देखील जॅकविषयी नवीन काही तरी ऐकण्यासाठी बघण्यासाठी उत्सुक असतात.

महत्वाच्या बातम्या
७५० कोटींची नोट विकायची आहे फक्त ५० लाखात, अजब आॅफर पाहून पोलीसही हैराण; पहा पुढे काय झालं…
भर कार्यक्रमात चोरट्याने केला शिवसेना नेत्याचा खिसा रिकामा, व्हिडिओ झाला व्हायरल
लक्झरी कार सोडून मुंबई लोकलने प्रवास करत होता ‘हा’ अभिनेता, साधेपणाचे लोकांनी केले कौतुक
‘या’ कायद्याच्या आधारे ईडी करत आहे आघाडीच्या मंत्र्यांवर कारवाया; जाणून घ्या काय आहे PMLA कायदा

ताज्या बातम्या बाॅलीवुड

Join WhatsApp

Join Now