Share

नवाब मलिक मुसलमान आहेत म्हणून…; शरद पवार आणि मोदींच्या ‘त्या’ भेटीवरून ओवेसी भडकले

सध्या धार्मिक मुद्यावरून महाराष्ट्र राजकारण आधीच तापलं आहे. त्यात आता एमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवैसी यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर निशाणा साधला आहे. संजय राऊत यांच्यावर कारवाई होऊ नाही यासाठी दिल्लीपर्यंत गेला मग नवाब मलिक यांच्यासाठी का नाही? ते मुस्लिम आहेत म्हणून का ? असा सवाल शरद पवारांना केला आहे. एका सभेत ते बोलत होते.

असदुद्दीन ओवैसी म्हणाले, मुघलांवरून मुस्लिमांना टार्गेट केलं जात आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार जेव्हा दिल्लीत गेले तेव्हा त्यांनी पंतप्रधान आणि सध्या देशाचा बादशाह होऊन बसलेले नरेंद्र मोदी यांची भेट घेतली आणि संजय राऊतांवर कारवाई करू नका सांगितलं.

संजय राऊत यांना जेलमध्ये टाकू नका शरद पवार म्हणाले. पण त्यांना नवाब मलिकांची आठवण का झाली नाही? हे मला राष्ट्रवादीच्या लोकांना विचारायचं आहे. असे ओवैसी म्हणाले. देशाच्या पंतप्रधानांना भेटताना तुमच्याच पक्षाचे नवाब मलिक यांच्याबद्दलही बोलायचं ना, असे ओवैसी म्हणाले.

तसेच म्हणाले, नवाब मलिकांचं नाव तुम्ही का घेतलं नाही?नवाब मलिक संजय राऊतांपेक्षा कमी आहेत का? मला शरद पवारांना विचारायचंय की तुम्ही नवाब मलिकांसाठी का बोलला नाहीत? ते मुस्लीम आहेत म्हणून का? ते आणि संजय राऊत समान नाहीत का? असा सवाल असदुद्दीन ओवैसी यांनी केला.

अत्याचार कारणाऱ्यांनो लक्षात ठेवा, सत्ता फार काळ कुणाचीच नसते. आज तुम्ही सत्तेच्या नशेत आहात म्हणून अनेकांना जेलमध्ये टाकत आहात. मात्र आल्हा त्यांनाच एकदिवस जेलमध्ये टाकतो. नवाब मलिक यांनाही सरकारने सोडले पाहिजे, असेही देखील ओवैसी म्हणाले.

असदुद्दीन ओवैसी यांनी शरद पवार यांच्यावर आरोप केल्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेस याला काय प्रतिउत्तर देतील पाहावं लागेल. तसेच असदुद्दीन ओवैसी यांच्या बोलण्यामुळे नवाब मलिक यांच्या भूमिकेवर काही परिणाम होणार का हे पाहावं लागेल.

राजकारण राज्य

Join WhatsApp

Join Now