आषाढी एकादशीला लाखो वारकऱ्यांचा पंढरपुरात मेळा जमतो. विठुरायाच्या दर्शनासाठी, चंद्रभागेत स्नान करण्यासाठी हजारोंच्या रांगा लागलेल्या असतात. यावर्षी मात्र चंद्रभागा नदी वारकऱ्यांसाठी जीवघेणी ठरताना दिसत आहे. दोन भाऊ चंद्रभागेत बुडता बुडता वाचले, अशी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. (As if Vitthal sent help for two brothers drowning in the moonlight)
पंढरपूरला येणाऱ्या वारकऱ्यांमध्ये १३४ जणांचा जीव आपत्कालीन पथकाने अशा प्रकारे वाचवला, अशी माहिती समोर येत आहे. इस्कॉन घाटाच्या डाव्या बाजूला नदी काठावर वारकऱ्यांचा धावा, धावा असा आवाज सुरू झाला. जीवरक्षक दीपक सदाफळे यांनी मागे बघताच त्यांना समजले की, दोन भाऊ चंद्रभागा नदीच्या मध्यभागी बुडत आहेत.
ते दोन भाऊ पाण्यामध्ये गटांगळ्या खात होते. आता इतर कोणी वाचवले तरच आपण वाचू शकतो. नाहीतर आपण मरणार असे समजून त्या दोघांनी एकमेकांना घट्ट मिठी मारली. त्यावेळी कपाळापर्यंत ते पाण्यात बुडाले होते.
त्याच वेळी क्षणाचा विलंब न करता अकोल्यातील मानवसेवा रेस्क्यू टीमने त्या दोन भावंडाच्या दिशेने आपली रेस्क्यू बोट वळवली. सदाफळे यांनी रेस्क्यू टीममधील इतर सर्वांना त्या दोन भावंडांच्या दिशेने लाइफरिंग फेकुन त्यांच्या जवळ पोहोचायला सांगितले.
काही मिनिटाच्या आतच रेस्क्यू टीमला त्या दोन भावंडांना वाचवण्यात यश आले. पाण्यामधून त्या दोघांना रेस्क्यू टीमने सुरक्षित बाहेर काढले. अजय कुमार कहाळ आणि अभिजीत कहाळ (पालघर) अशी त्या दोन भावांची नावे आहेत.
पाण्यामध्ये पूर्ण बुडाले असताना आपण जगणार नाही, असे त्या भावंडांना वाटले होते. पण विठुरायाची कृपाच म्हणावी लागेल, शेवटच्या क्षणी मदत मिळाल्याने त्यांचा जीव वाचला. ‘देव तारी त्याला कोण मारी’ अगदी या उक्तीप्रमाणे घडले.
महत्वाच्या बातम्या-
स्मिता तांबेच्या मुलीचं झालं बारसं, नवऱ्यानेच शोधलं मुलीसाठी गोंडस नाव, तुम्हालाही आवडेल
‘उद्धवसाहेबांच्या जागी दुसरा कोण असता तर रक्ताचे पाट वाहिले असते’, आमदाराचे मोठे वक्तव्य
जे पाणी गावकरी पितात तेच पाणी पिण्यास नवनीत राणांनी दिला नकार, म्हणाल्या…