Share

Amit Shah : बाप हा बापच असतो! अमित शाहांनी जय शाहांना खडसावलं, व्हिडीओ झाला व्हायरल

Amit Shah

Amit Shah : आपण कितीही मोठे झालो, कितीही मोठ्या पदावर गेलो तरी आपल्या आईवडिलांच्या पुढे कधीच जाऊ शकत नाही. आपलं काही चुकलं तर आपल्याला आईवडिलांचं ऐकावंच लागत असतं. आईवडीलही आपल्याला योग्य तेच सांगत असतात.

अशीच एक घटना BCCI चे सचिव जय शाह यांच्यासोबत घडली आहे. नुकताच भाजपचे केंद्रीय मंत्री अमित शाह आणि BCCI चे सचिव जय शाह यांचा एक व्हिडीओ समोर आला आहे. यात अमित शाह जय शहांना रागवताना दिसत आहे.

या व्हिडिओमध्ये अमित शाह व जय शाह हे एकमेकांच्या बाजूला उभे आहेत. ते दोघेही पूजा करत आहेत. यावेळी जय शाह हे मध्येच कुणाशीतरी बोलताना दिसत आहेत. अमित शहांचे त्यांच्याकडे लक्ष जातात ते जय शहांना रागवत आहेत.

अमित शाह जय शहांना इकडे म्हणजेच पूजेकडे लक्ष दे असे खुणावताना दिसत आहेत. सोशल मीडियावर हा व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत आहे. या व्हिडिओवर नेटकऱ्यांकडून प्रतिक्रियाही येत आहेत. बाप तो बाप होता है, अशा प्रकारच्या कमेंट्स या व्हिडिओवर येत आहेत.

या व्हिडिओला प्रचंड लाईक्सदेखील आलेल्या आहेत. बाप हा बापच असतो, मग तो मिडलक्लास लोकांचा असो किंवा BCCI सेक्रेटरीचा असो, अशा प्रतिक्रिया या व्हिडिओवर येत आहेत. नेटकरी या व्हिडिओचा चांगलाच आनंद लूटत आहेत.

महत्वाच्या बातम्या
Raj thackeray : जेव्हा जेव्हा अशी कीड तयार होईल तेव्हा; अमित शाहांना टॅग करत राज ठाकरेंची प्रतिक्रिया
amit shah : अमित शाह यांच्या बैठकीत नाराजीनाट्य..! भाजपच्या फायरब्रँड नेत्यालाच दाखवला बाहेरचा रस्ता; वाचा सविस्तर
eknath khadse : अमित शाहांच्या भेटीसाठी खडसे सासरे-सून दिल्लीला; घरवापसीच्या चर्चाना आलं उधाण
Shivsena : अमित शाहांच्या टीकेला शिवसेनेचे प्रत्युत्तर, म्हणाले, ते काय आम्हाला जमीन दाखवणार, आम्हीच

 

ताज्या बातम्या इतर

Join WhatsApp

Join Now