Share

किंग खानचा मुलगा करणार बॉलिवूडमध्ये पदार्पण, पण अभिनयाच्या ऐवजी करणार ‘हे’ काम

काही वर्षांपासून बॉलिवूडमध्ये कलाकारांच्या मुलांचा बोलबाला सुरू आहे. अनेक दिग्गज कलाकार हे आपल्या मुलांना चित्रपटसृष्टीत घेऊन येत आहेत. यामध्ये सारा अली खान, जानव्ही कपूर, आलिया भट्ट, वरुण धवन, श्रद्धा कपूर अशा अनेक कलाकारांचा समावेश आहे. या कलाकारांच्या मुलांनी देखील आपल्या अभिनयाने बॉलिवूडमध्ये स्थान निर्माण केले.

 

मात्र मागील काही दिवसांपासून सर्वांना बॉलिवूडचा किंग खान म्हणजेच शाहरुख खानच्या मुलाची प्रतीक्षा आहे. याबद्दल स्वतः शाहरुख खानने खुलासा केला आहे. शाहरुखचा मुलगा आर्यन खान चित्रपटसृष्टीत कधी पदार्पण करेल, असा प्रश्न प्रत्येकाच्या मनात घोळत आहे. मात्र आर्यनचा कल अभिनयाकडे नसून चित्रपट निर्मितीकडे असल्याचे शाहरुखने अनेकदा मुलाखतींमध्ये सांगितले आहे.

 

मात्र सध्या आर्यन खान लवकरच चित्रपटसृष्टीत डेब्यू करणार असल्याच्या बातम्या येत आहेत. माध्यमांच्या माहितीनुसार, आर्यन सध्या अनेक आयडियावर काम करत आहे. यामध्ये वेब सिरीज आणि फीचर फिल्म्सचा समावेश आहे. आर्यन सध्या रेड चिलीज एंटरटेनमेंटच्या बॅनरसोबत काम करत आहे. ही एक वेब सीरिज असून अमेझॉन प्राइमची ही वेब सीरिज आहे. यासोबतच एक फीचर फिल्मही बनवण्यात येणार आहे.

 

त्याचबरोबर अशीही बातमी समोर आली आहे की, आर्यन खानच्या या वेब सीरिजमध्ये एका कट्टर चाहत्याची कथा असेल. ज्याचे जीवन रोमांचक असेल. मात्र सध्या या फीचर फिल्मबद्दल कोणतीही माहिती समोर आलेली नाही. असे ही म्हंटले जाते की, जर सर्व काही सुरळीत झाले तर यावर्षी शूटिंग सुरू होऊ शकते.

 

महत्वाचे म्हणजे आर्यन खान सध्या रेड चिलीजसोबत फक्त दोनच नाही तर आणखी विषयांवर काम करणार आहे. माध्यमांच्या माहितीनुसार, आर्यन खान सह-लेखक बिलाल सिद्दीकीसोबत या सर्व विषयांवर काम करत आहे. आता चाहते आर्यन खानच्या या नवीन प्रोजेक्टची आतुरतेने वाट पाहत आहेत.

 

आपल्या सर्वांना माहितीच आहे की, आर्यन खान या अगोदर ड्रग्ज प्रकरणामुळे चर्चेत होता. ड्रग्ज प्रकरणात १ ऑक्टोबर रोजी आर्यनला ताब्यात घेतले होते. त्यानंतर २ ऑक्टोबर रोजी त्याच्या सह ७ जणांना अटक करण्यात आली. हे संपूर्ण प्रकरण मुंबई एनसीबीचे प्रादेशिक संचालक समीर वानखेडे आणि त्यांच्या टीमने समोर आणले होते.

 

मात्र तपास करूनही आर्यनकडे कोणतेही ड्रग्ज मिळाले नाही. त्यानंतर २८ ऑक्टोबर रोजी त्याला जामीन मिळाला. मात्र तोपर्यंत त्याने ४ आठवडे एनसीबी आणि न्यायालयीन कोठडीत घालवले. त्यानंतर या प्रकरणाचा पुढील तपास एजन्सीच्या दिल्ली टीमकडे सोपवण्यात आला. एनसीबीच्या तपासादरम्यान या प्रकरणी एकूण २० जणांना अटक करण्यात आली होते. तसेच काहींना जामीन देखील मिळाला आहे.

 

ताज्या बातम्या

Join WhatsApp

Join Now