Share

PHOTO: ड्रग्स प्रकरणी जेलमधून सुटल्यानंतर पहिल्यांदाच IPL लिलावात दिसला आर्यन; सुहानाही होती सोबत

Aryan Khan and Suhana Khan

इंडियन प्रीमीयर लीग अर्थात आयपीएल २०२२ या खेळासाठी खेळाडूंच्या लिलाव प्रक्रियेस शनिवारी बंगळुरुमध्ये सुरुवात झाली. यादरम्यान या लिलावाच्या ठिकाणी अभिनेता शाहरूख खानचा मुलगा आर्यन खान आणि मुलगी सुहाना खानही (Aryan Khan and Suhana Khan) दिसून आली. त्यांचे हे फोटो सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत.

आर्यन खान आणि सुहाना खान लिलावाच्या ठिकाणी कोलकाता नाईट राइडर्सकडून सहभागी झाले होते. यावेळी त्यांच्यासोबत अभिनेत्री जुही चावलाची मुलगी जान्हवी मेहतासुद्धा हजर होती. शाहरूख हा कोलकाता नाईट राइडर्सचा मालक आहे. तर जुही चावला या टीमची को-ओनर आहे.

शाहरूख आणि गौरीन खानच्या ‘रेड चिलीज एंटरटेनमेंट’ तसेच जूही चावला आणि तिचा पती जय मेहता यांच्या ‘मेहता ग्रुप’ द्वारे ‘कोलकाता नाईट रायडर्स’ची टीम खरेदी करण्यात आली आहे. कोलकाता नाईट राइडर्सच्या अधिकृत ट्विटर हँडलवरही आर्यन, सुहाना आणि जान्हवीचे फोटो शेअर करण्यात आले आहेत.

शाहरूख खान आणि जुही चावला या लिलावाच्या ठिकाणी दिसले नाही. पण त्यांच्या स्टारकिड्सचे फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत असून हे फोटो सर्वांचे लक्ष वेधून घेत आहेत.

दरम्यान, आयपीएल २०२२ ला आता काहीच महिने शिल्लक राहिले आहे. त्यामुळे क्रिकेट प्रेमी आतुरतेने आयपीएल सुरु होण्याची वाट पाहत आहे. तसेच यावेळी दोन नवीन संघ आले आहेत. त्यामुळे यंदाच्या आयपीएलमध्ये एकूण १० संघ आयपीएल खेळणार आहे. त्यामुळे सर्व संघांमध्ये मोठा बदल होताना दिसून येणार आहे.

शाहरूखचा मुलगा आर्यन खान मागील वर्षी ड्रग्ज प्रकरणामुळे फारच चर्चेत आला होता. तर जेलमधून बाहेर पडल्यानंतर आर्यन आता पहिल्यांदाच सार्वजनिक ठिकाणी दिसून आला. दुसरीकडे शाहरूखची मुलगी सुहाना खान नुकतीच अमेरिकेहून भारतात परतली आहे. उच्च शिक्षणासाठी ती अमेरिकेत गेली होती. तर आता शिक्षण पूर्ण झाल्यानंतर ती मुंबईत परतली आहे.

महत्त्वाच्या बातम्या :
रणबीर कपूरच्या ‘शमशेरा’चा टीझरने जिंकले सर्वांचे मन, या दिवशी चित्रपटगृहांमध्ये होणार प्रदर्शित
एकता कपूरच्या यशामागे आहे अशोक सराफ यांचा हात, एकताने सांगितले खरे कारण…
शारिरीक संबंध न ठेवताच तेजस्वी प्रकाश बिग बॉसच्या घरात झाली प्रेग्नेंट? घरातील सदस्याचा खुलासा

खेळ बाॅलीवुड मनोरंजन

Join WhatsApp

Join Now