Share

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचा दाखला देतं ठाकरे गटाची थेट मुख्यमंत्री शिंदेंवर घणाघाती टीका, वाचा काय म्हंटलंय?

राज्याच्या राजकारणात भूकंप झाला. शिवसेनेत उभी फूट पडल्यानंतर एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली आमदार आणि खासदारांचा एक मोठा गट फुटून बाहेर पडला. त्यामुळे महाविकास आघाडीचं सरकार कोसळलं आणि राज्यात शिंदे शाही पर्वास सुरुवात झाली.

अन् त्यानंतर राज्यातील सत्तासंघर्ष थेट कोर्टात पोहचला आहे. आज पुन्हा एकदा राज्यातील सत्तासंघर्षाची सुनावणी लांबणीवर गेली आहे. आता २७ सप्टेंबर रोजी या प्रकरणावर पुढील सुनावणी होणार आहे. सुप्रीम कोर्टाने तात्काळ सुनावणी घ्यावी आणि निवडणूक आयोगाची प्रक्रिया सुरु ठेवण्याचे आदेश द्यावे, अशी मागणी शिंदे गटाने सुप्रीम कोर्टाकडे केली होती.

यासाठी त्यांनी रिट याचिका दाखल केली होती. यावर त्यांना आज घटनापीठाची स्थापना केली जाणार असल्याचे आश्वासन न्यायालयाने दिले होते. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचा दाखला देतं ठाकरे गटाने शिंदे थेट राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर जहरी टीका केली आहे.

शिवसेना नेते खासदार अरविंद सावंत यांनी याबाबत भाष्य केलं आहे. ‘देशाचे गृहमंत्री अमित शहा मुंबईत येऊन सांगतात की, शिंदे गटाची शिवसेना हीच खरी शिवसेना आहे. त्यावेळी, लोकं दाढीवर हात ठेऊन बघत असतात, असे म्हणत सावंत यांनी प्रत्यक्षपणे मुख्यमंत्री शिंदेंवर निशाणा साधला आहे.

दरम्यान, सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचा दाखला देतं सावंत यांनी म्हंटलं आहे की, ‘सध्या शिंदे गटातील आमदारांवर अपात्रतेची टांगती तलवार आहे, त्यामुळे, तोपर्यंत याबाबती निर्णय घेता येणार नाही, अशी मागणी आमच्या वकिलांनी न्यायालयाकडे केली. मग, न्यायालयाने २७ सप्टेंबर ताराख दिल्याचे सावंत यांनी स्पष्ट केलं आहे.

राज्यातील सत्तासंघर्षाच्या सुनावणीसाठी आज घटनापीठाची स्थापना करण्यात आली आहे. या घटनापीठामध्ये न्या. धनंजय चंद्रचूड, न्या. एम. आर. शहा, न्या. कृष्ण मुरारी, न्या. हिमा कोहली आणि न्या. पी. नरसिंहा इत्यादींचा समावेश करण्यात आला आहे. यावेळी घटनापीठाने ठाकरे आणि शिंदे या दोन्ही बाजूंच्या वकिलांचा युक्तिवाद ऐकून पुढील सुनावणी २७ सप्टेंबरला घेण्याचे स्पष्ट केले आहे.

न्या. धनंजय चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखाली आजची सुनावणी पार पडली. यावेळी शिवसेनेकडून कपिल सिब्बल यांनी तर शिंदे गटाकडून नीरज कौल यांनी युक्तिवाद केला. शिवसेनेचे धनुष्यबाण चिन्ह गोठवावे अशी मागणी शिंदे गटाकडून करण्यात आली आहे.

महत्त्वाच्या बातम्या

…तर आम्ही राज ठाकरेंनाच बाहेर काढू; भाजपच्या केंद्रीय मंत्र्याने स्पष्टच सांगीतलं
‘आम्हाला नाही, तर तुम्हालाही नाही’, शिंदे गटाने आखली वेगळीच रणनीती, उद्धव ठाकरेंसमोरील अडचणींमद्धे वाढ
Supreme Court : शिंदेगटाची मागणी सुप्रीम कोर्टाने फेटाळली, ठाकरे गटाला मोठा दिलासा; पहा काय घडलं कोर्टात…
Girish Bapat : …म्हणून मी पक्षावर नाराज आहे; पुण्यातील भाजपच्या बड्या नेत्याने जाहीरच सांगीतले

इतर ताज्या बातम्या राजकारण राज्य

Join WhatsApp

Join Now