जिओने डेटा स्वस्त केल्यापासून भारतात इंटरनेट वापरकर्त्यांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. सोशल मीडियापासून ते स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्मपर्यंत(Streeming Platform) सर्वत्र वापरकर्त्यांची संख्या वाढली आहे.(arun-kushwaha-is-making-millions-on-youtube-by-quitting-his-job-at-wipro)
मग यात YouTube कुठे मागे राहणार आहे? यूट्यूबवर केवळ व्हिडिओ पाहणाऱ्यांची संख्याच नाही तर कंटेंट निर्माण करणाऱ्यांचीही संख्या जास्त आहे.
अनेक नव्या चेहऱ्यांनी यूट्यूबवर नाव कमावले आहे. यातील एक नाव अरुण कुशवाह(Arun Kushavah) याचे आहे. TVF (द व्हायरल फिव्हर) चॅनलच्या व्हिडिओंमुळे प्रसिद्ध झालेल्या छोटे मियाचे खरे नाव अरुण कुशवाह असून तो मूळचा मध्य प्रदेशचा आहे.
अरुणने जेएनयूमधून(JNU) ग्रॅज्युएशन पूर्ण केले आहे आणि तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की त्याची पहिली नोकरी विप्रोमध्ये होती. त्याने एका मुलाखतीत सांगितले की, त्याने पहिल्या पगारातून लॅपटॉप खरेदी केला होता.
अरुण जेव्हा विप्रोमध्ये काम करत होता तेव्हा त्याचा मित्र TVF मध्ये काम करत होता. त्याच्या मित्रानेच त्याला TVF जॉईन करण्यासाठी संपर्क साधला होता. अरुणने TVF मध्ये रोलसाठी अर्ज केला आणि त्यामुळे त्याचा इंडस्ट्रीत प्रवेश झाला. TVF जॉईन करण्यापूर्वी अरुण त्याच्या चॅनलवर डब मॅशअप करत असे.
अरुणची उंची सामान्यपेक्षा लहान आहे, त्यामुळे त्याला खूप त्रास सहन करावा लागला. त्याने स्वतः एका मुलाखतीत याचा खुलासा केला आहे.
लोक त्याच्या उंचीची चेष्टा करायचे, पूर्वी त्याला असे वाटायचे की फक्त अनैतिक लोकच त्याच्या उंचीची चेष्टा करतात. पण बाहेरचे जग पाहिल्यावर त्याला कळले की सुशिक्षित लोकही चांगले नाहीत. याचे अरुणला फार वाईट वाटले.
पण हे त्यानी आपल्या अभिनयाच्या आड कधी येऊ दिले नाही. त्यानी विविध भूमिका केल्या आणि लोकांचे भरपूर मनोरंजन(Entertainment) केले. आजही तो यूट्यूबवर सक्रिय आहे आणि प्रेक्षक त्याला खूप पसंत करतात.