Share

Arshdeep Singh : ‘पाजी तुस्सी ग्रेट हो’; थरारक सामन्यात भारताला जिंकवणाऱ्या अर्शदीपचे चाहत्यांकडून तुफान कौतूक

Arshdeep Singh

Arshdeep Singh : टी-२० विश्वचषक २०२२ चा ३५ वा सामना टीम इंडिया आणि बांगलादेश (IND vs BAN) यांच्यात खेळला गेला. प्रथम फलंदाजी करताना भारतीय संघाने बांग्लादेशपुढे १८५ धावांचे लक्ष्य ठेवले होते. मात्र, पावसामुळे लक्ष्य आणि षटके बदलण्यात आली.

पावसामुळे या सामन्यात बांगलादेशला १६ षटकांत १५१ धावांचे लक्ष्य मिळाले. परंतु, शकीब अल हसनच्या संघाला हे लक्ष्य गाठता आले नाही. त्याचवेळी भारतीय संघाचा हिरो हा अर्शदीप सिंग होता. त्याने अखेरच्या षटकात संघाला शानदार विजय मिळवून दिला.

त्यामुळे चाहते त्याचे जोरदार कौतुक करताना दिसत आहेत. बांग्लादेशने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना भारतीय संघाने शानदार कामगिरी करत १८५ धावांचे लक्ष्य दिले. मात्र, पावसामुळे सामना विस्कळीत झाला. त्यामुळे बांगलादेशला १६ षटकांत १५१ धावांचे लक्ष्य देण्यात आले.

परंतु, बांगलादेश सुधारित लक्ष्य गाठण्यात सपशेल अपयशी ठरला. बांगलादेशला ६ गडी गमावून १४५ धावाच करता आल्या. परिणामी भारताने ६ धावांनी विजय मिळवला. त्याचवेळी अर्शदीप सिंग हा भारतीय संघासाठी चमकदार कामगिरी करणारा ठरला.

https://twitter.com/Dhruva98203814/status/1587775064766042112?t=xY8UCrRN9EeaS-JYpc0F1w&s=19

अर्शदीप सिंगने भारतीय संघासाठी विकेट घेण्यासोबतच उत्कृष्ट क्षेत्ररक्षणही केले. याशिवाय अखेरच्या षटकात चुरशीची गोलंदाजी करत त्याने टीम इंडियाला विजय मिळवून दिला. त्याची कामगिरी पाहिल्यानंतर चाहते आनंदात आहेत आणि त्यांनी गोलंदाजाचे जोरदार कौतुक केले आहे.

https://twitter.com/Virtual_Vichar/status/1587775089554046976?s=20&t=WIOzzfO7cNx2_wWQtcANcw

चाहत्यांनी ट्विटरवर ट्विट करत अर्शदीप सिंगचे कौतुक केले आहे. यापैकी एका ट्विटमध्ये तर सरळ अर्शदीपला भारत रत्न देण्याची मागणी करण्यात आली आहे. या ट्विटमध्ये लिहिले की, “भारत सरकारला विनंती आहे की अर्शदीप सिंगला भारतरत्न देण्याची घोषणा करावी.”

महत्वाच्या बातम्या
KL Rahul : खराब फॉर्ममध्ये असलेल्या केएल राहूलची संघातून होणार हकालपट्टी? द्रविड म्हणाला… 
T20 World Cup : … म्हणून न्युझीलंड दौऱ्यावर विराट-रोहितला विश्रांती देण्यात आली; निवडकर्त्यांचा केला मोठा खुलासा
shivsena : सत्ता गेली तरी पक्षाला लागलेली गळती थांबेणा; मातोश्रीचा निष्ठावंत नेता शिंदे गटात सामील
shivsena : राज्यातील शिंदे – फडणवीस सरकार कोसळणार; सुप्रीम कोर्टातील घडामोडीनंतर घटनातज्ञांनी स्पष्टच सांगीतलं  

ताज्या बातम्या खेळ

Join WhatsApp

Join Now