बॉलिवूड अभिनेता सलमान खानच्या ‘कभी ईद कभी दिवाली’ (Kabhi Eid Kabhi Diwali) या चित्रपटासाठी चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. जेव्हापासून या चित्रपटाची घोषणा झाली तेव्हापासूनच चित्रपटासंबंधित प्रत्येक बातमी वेगाने व्हायरल होत आहे. यादरम्यान नुकतंच अशी बातमी समोर आली होती की, ‘कभी ईद कभी दिवाली’ चित्रपटात श्रेयस तळपदे आणि अरशद वारसीला काढून टाकण्यात आले आहे. त्यावर आता श्रेयस आणि अरशदने आपली प्रतिक्रिया दिली आहे.
‘कभी ईद कभी दिवाली’ (Kabhi Eid Kabhi Diwali) चित्रपटाबाबत नुकतंच अशी बातमी समोर आली होती की, अरशद आणि श्रेयस या चित्रपटात सलमान खानच्या भावाची भूमिका साकारणार होते. परंतु, या दोघांना चित्रपटातून रिप्लेस करण्यात आले असून त्यांच्या जागी सलमानचा मेव्हणा आयुष शर्मा आणि जहीर इकबाल यांना घेण्यात आले आहे.
सलमान खानमुळे या दोघांना चित्रपटातून रिप्लेस करण्यात आल्याचे सांगण्यात आले. तसेच आयुष शर्मा आणि जहीर इकबाललाच सुरुवातीला चित्रपटाची ऑफर देण्यात आली होती. परंतु, चित्रपटात त्यांची भूमिका लहान असल्याने त्यांनी चित्रपटास नकार दिला. पण आता पुन्हा ते चित्रपटात काम करण्यास इच्छुक आहेत, असे सांगण्यात येत होते.
यादरम्यान अरशद वारसी आणि श्रेयस तळपदेने या चर्चांवर आपले मौन सोडले आहे. बॉलिवूड हंगामाशी बोलताना अरशदने म्हटले की, ‘तुमची माहिती चुकीची आहे. मला ‘कभी ईद कभी दिवाली’ (Kabhi Eid Kabhi Diwali) या चित्रपटाची कधी ऑफरच मिळाली नाही. त्यामुळे मला चित्रपटातून काढून टाकण्याच प्रश्नच येत नाही’.
त्यानंतर श्रेयसने या बातम्यांबाबत आपली प्रतिक्रिया देताना यावर त्याला काही बोलायचे नाही, असे म्हटले. श्रेयसने म्हटले की, ‘फरहाद माझा चांगला आणि खास मित्र आहे. तो चांगले चित्रपट काढतो. आणि मी त्याचे हिट चित्रपट पाहू इच्छित आहे. जरी मी त्या चित्रपटात असो किंवा नसो’.
दुसरीकडे न्यूज १८ च्या वृत्तानुसार, सूत्राने सांगितले की, ‘कभी ईद कभी दिवाली’मध्ये (Kabhi Eid Kabhi Diwali) आयुष आणि जहीरला अरशद आणि श्रेयसची जागा देण्यात आली नाही. श्रेयस आणि अरशद या चित्रपटाचे कधी भागच नव्हते. त्यामुळे त्यांना चित्रपटातून रिप्लेस करण्याचा प्रश्नच येत नाही. दरम्यान, सध्या या चित्रपटाच्या कास्टबाबत गोंधळाचे वातावरण आहे. त्यामुळे या चित्रपटात नेमके कोणकोणते कलाकार भूमिका साकारणार, हे येणाऱ्या काळातच कळेल.
दरम्यान, दिग्दर्शक फरहाद दामजी या चित्रपटाचे दिग्दर्शन करत आहेत. यामध्ये पूजा हेगडे सलमानची अभिनेत्री असणार आहे. सलमान आणि पूजा पहिल्यांदाच या चित्रपटाद्वारे एकत्र काम करताना दिसणार आहेत. तसेच दक्षिणेकडील प्रसिद्ध अभिनेता व्यंकटेशसुद्धा या चित्रपटात मुख्य भूमिकेत दिसणार आहे. ३० डिसेंबर २०२२ रोजी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या :
VIDEO: यशचा साधेपणा पाहून चाहते भावूक; म्हणाले, ‘तुझा हा साधेपणाच तुझ्या यशाचे खरे रहस्य आहे’
‘या’ चित्रपटातून श्रेयस तळपदे आणि अरशद वारसीची हकालपट्टी? सलमानने मेव्हण्याला दिली पसंती
‘या’ साऊथ अभिनेत्रींचे MMS झाले होते लीक; दिसून आल्या होत्या आक्षेपार्ह स्थितीत