Share

VIDEO: मुंबई इंडियन्समध्ये निवड झाल्यानंतर अर्जुन तेंडूलकरचा आनंद गगनात मावेना, म्हणाला..

महान फलंदाज सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन तेंडुलकरची आयपीएल लिलावादरम्यान मुंबई इंडियन्सच्या संघात निवड झाली आहे. अर्जुन तेंडुलकरला मुंबई इंडियन्सने 30 लाखांमध्ये विकत घेतले. मुंबई इंडियन्स संघात निवड झाल्यानंतर अर्जुन तेंडुलकरने मोठी प्रतिक्रिया दिली आहे.(Arjun Tendulkar’s happiness skyrocketed)

मुंबई इंडियन्सने अर्जुन तेंडुलकरला लिलावात गेल्या वर्षीच्या तुलनेत जास्त रक्कम देऊन विकत घेतले. लिलाव प्रक्रियेच्या शेवटी अर्जुन तेंडुलकरचे नाव यादीत आले. यानंतर मुंबई इंडियन्सने त्याच्या बेस प्राईससाठी 20 लाख रुपयांची बोली लावली.

मुंबईने बोली लावल्यानंतर, गुजरात टायटन्सनेही स्वारस्य दाखवत 25 लाख बोली लावली. यानंतर मुंबईने पुन्हा बोली लावली आणि यावेळी गुजरातने अर्जुन तेंडुलकरला मुंबई इंडियन्सकडे जाऊ दिले. अशाप्रकारे सलग दुसऱ्या वर्षी अर्जुन तेंडुलकरचा मुंबई इंडियन्सने समावेश केला.

गुजरात टायटन्सने अर्जुनवर बोली लावल्यानंतर मुंबई संघाचे मालक आकाश अंबानी यांना आश्चर्य वाटले त्यांनी पटकन 30 लाखासाठी अर्जुनला बोली लावली. त्यावर अन्य कोणीही बोली न लावल्याने एडमीड्सने तो मुंबई संघात दाखल झाल्याचे जाहीर केले. या घोषणेनंतर हॉलमध्ये एकच हशा सुरू झाला.

त्याचवेळी अर्जुन तेंडुलकरने मोठी प्रतिक्रिया दिली आहे. मुंबई इंडियन्सच्या सोशल मीडिया पेजवर शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये तो म्हणाला, मुंबई इंडियन्स संघात पुनरागमन करताना मला खूप आनंद झाला आहे. मी लहानपणापासून या संघाचा मोठा चाहता आहे. माझ्यावर विश्वास ठेवल्याबद्दल मी संघ मालक आणि सपोर्ट स्टाफचे आभार मानू इच्छितो. मी संघात सामील होण्यासाठी आणि माझे सर्वोत्तम देण्यासाठी तयार आहे.

आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की, आयपीएल 2022 च्या मेगा लिलावादरम्यान, मुंबई इंडियन्सने जोफ्रा आर्चरचाही त्यांच्या संघात समावेश केला होता. आयपीएल लिलावाच्या दुस-या दिवशी जोफ्रा आर्चरचे नाव समोर आले तेव्हा राजस्थान रॉयल्स आणि मुंबई इंडियन्सने सर्वप्रथम बोली लावली आणि शेवटी मुंबईने 8 कोटींची बोली लावून आर्चरचा संघात समावेश केला

महत्वाच्या बातम्या-
अवघ्या 50 हजार रुपयांत सुरू करा हा व्यवसाय, होईल मोठा नफा, सरकारही करेल मदत
…तर मी ‘त्या’ दलालाला जोड्यानं मारेन; संजय राऊत किरीट सोमय्यांवर बरसले
राऊत विरुद्ध सोमय्या: …तर मी राजकारण सोडेन; संजय राऊतांचे किरीट सोमय्या यांना आव्हान
भाजपला दणका! माजी मुख्यमंत्र्यांच्या मुलाने आमदारांसह केला शिवसेनेत प्रवेश, राजकीय वर्तुळात खळबळ

ताज्या बातम्या

Join WhatsApp

Join Now