मुंबईने शनिवारी वानखेडे स्टेडियमवर दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध हंगामातील शेवटचा सामना खेळला. या सामन्यापूर्वी अर्जुनने मुंबई इंडियन्सच्या फलंदाजांना नेटमध्ये गोलंदाजी करतानाचे काही व्हिडिओ पोस्ट केले होते, त्यानंतर असा अंदाज वर्तवला जात होता की ज्युनियर तेंडुलकर कदाचित डीसीविरुद्ध आयपीएलमध्ये पदार्पण करेल.
मात्र, त्याला मुंबई इंडियन्सच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान मिळाले नाही आणि अर्जुन तेंडुलकरला खेळताना पाहण्याची चाहत्यांची प्रतीक्षा आणखी एक वर्ष लांबली. दरम्यान, मुंबई इंडियन्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्सच्या सामन्यात अर्जुन खेळाडूंना सीमारेषेवर मदत करताना दिसला.
बॅटची बदली करायची असो की पाण्यासाठी, अर्जुन संपूर्ण सामन्यात सीमारेषेजवळ दिसला. दरम्यान, अर्जुनची बहीण सारा तेंडुलकरने त्याचा एक व्हिडिओ बनवला आणि तिच्या इन्स्टाग्रामवर ‘गली बॉय’ या बॉलिवूड चित्रपटातील ‘अपना टाइम आएगा’ या गाण्याचा कॅप्शन देऊन तिने पोस्ट केली आहे.
सारा तेंडुलकरने या हंगामात मुंबई इंडिन्सच्या सामन्यांचा मनापासून आनंद लुटला. सामन्यासाठी रवाना झाल्यापासून, सामन्यादरम्यान, ती तिच्या सोशल मीडिया हँडलवर सतत फोटो आणि कथा पोस्ट करत आहे. या सामन्यात मुंबई इंडियन्सच्या विजयानंतरही सारा आणि तिच्या मैत्रिणी स्टँडवर सेलिब्रेशन करताना दिसल्या.
सारा ही प्रसिद्धीच्या बाबतीत आपले वडील सचिन तेंडुलकर यांच्यापेक्षा कमी नाही. ती दिसायला खूपच सुंदर असल्याकारणानं नेहमीच लोकांचं लक्ष आपल्याकडे वळवून घेण्यात यशस्वी ठरते. तिच्या चाहत्यांची संख्याही दिवसेंदिवस वाढत आहे.
फक्त इन्स्टाग्रामवरच तिचे एक मिलियनपेक्षा जास्त फॅन फॉलॉइंग आहेत. सारा तेंडूलकर सध्या 24 वर्षांची आहे. आणि सध्या ती मॉडेलिंग करत आहे. ती लवकरच बॉलिवूड मध्ये पदार्पण करणार असल्याचे बोलले जात आहे. सध्या ती तिच्या भावाला खेळण्यासाठी चेअरअप करत आहे, त्यामुळे चाहते तिच्यावर खुश आहेत.