Share

अर्जून तेंडूलकरने लगावले ७ षटकार; नंतर घातक गोलंदाजीच्या जोरावर एकहाती जिंकवला सामना

Cricket: सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीनंतर आता विजय हजारे ट्रॉफीही सुरू झाली आहे. देशांतर्गत क्रिकेटमध्ये राष्ट्रीय संघात पुनरागमन करण्यासाठी खेळाडू मेहनत घेत आहेत. गोवा विरुद्ध बिहार सामन्यात अर्जुन तेंडुलकरने शानदार गोलंदाजी केली. अर्जुन तेंडुलकरने सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्येही चांगली कामगिरी केली होती.

अर्जुन विजय हजारे ट्रॉफीमध्ये गोव्याकडून खेळतो. गोव्याचा बिहारशी सामना होत असल्याने गोव्याने अर्जुन तेंडुलकरला प्लेईंग इलेव्हनमध्ये खेळण्याची संधी दिली. अर्जुन तेंडुलकरने या संधीचा चांगला उपयोग केला, अर्जुनने या सामन्यात ७ षटकार मारले. त्याने २ खेळाडूंचे बळी घेतले.

यादरम्यान त्यांचा इकॉनॉमी रेट ४.५७ होता. अर्जुनच्या या गोलंदाजीच्या जोरावर गोव्याने रोमांचक सामन्यात बिहारचा पराभव केला. अर्जुन तेंडुलकर हा क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकरचा एकुलता एक मुलगा आहे हे सर्वांनाच माहीत आहे. पण क्रिकेटमध्ये वडिलांच्या टॅलेंटवर मुलाला संधी मिळत नाही, इथे त्यालाच चांगली कामगिरी करावी लागते.

अर्जुन तेंडुलकरने आजपर्यंत चांगली कामगिरी केली आहे. अर्जुन तेंडुलकरने सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीच्या एका सामन्यात ४ विकेट घेतल्या आणि आता त्याने विजय हजारे ट्रॉफीमध्येही चांगली कामगिरी केली आहे. २०२० मध्ये, मुंबई इंडियन्सच्या संघाने अर्जुन तेंडुलकरला १० लाखांच्या मूळ किंमतीला खरेदी केले.

आत्तापर्यंत अर्जुन तेंडुलकरला आयपीएलमध्ये एकही सामना खेळायला मिळालेला नाही. पुढच्या हंगामात म्हणजेच २०२१ मध्ये पुन्हा एकदा अर्जुन तेंडुलकरला २० लाखांमध्ये संघात समाविष्ट करण्यात आले. अर्जुन तेंडुलकरला यावेळी आयपीएलमध्ये खेळण्याची संधी मिळते का, हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.

महत्वाच्या बातम्या –
Sachin tendulkar : आपल्या मुलाचं टीम इंडियात सिलेक्शन व्हावं म्हणून सचिन तेंडुलकरने ‘या’ देवाला घातलं साकडं
Ravindra Jadeja : स्टार क्रिकेटर रविंद्र जडेजाची बायको आणि बहीणीने एकमेकींविरोधात ठोकले शड्डू
sachin tendulkar : भारताच्या पराभवानंतर सचिनने केले हैराण करणारे ट्विट; म्हणाला, जसा विजय साजरा केला तसा…

खेळ ताज्या बातम्या

Join WhatsApp

Join Now