बॉलिवूड अभिनेता अर्जुन कपूर एकेकाळी खूप जाड(लठ्ठ) होता, त्याने चित्रपटात येण्यापूर्वी वजन कमी करण्यासाठी खूप मेहनत घेतली होती. त्याचप्रमाणे भाऊ अर्जुन कपूरप्रमाणे अंशुला कपूरनेही तिच्या फिटनेसवर लक्ष केंद्रित करायला सुरुवात केली आहे. अंशुला कपूरने शुक्रवारी तिच्या सोशल मीडिया अकाउंटवर एक फोटो पोस्ट केला. फोटोमध्ये अंशुला पूर्वीपेक्षा खूपच स्लिम दिसत आहे.(Arjun Kapoor’s sister loses weight and surprises everyone)
अंशुलाने इंस्टाग्रामवर वजन कमी करण्याच्या आधीचा आणि नंतरचा फोटो शेअर केला आहे. अंशुलाने मिरर सेल्फी शेअर केला आणि लोकांनी तिचे कौतुक केले पाहिजे अशी एक नोट लिहिली आहे. तिने लिहिले आहे की, ‘आपला मेकअप काढा, केस खाली मोकळे सोडा. एक श्वास घेत स्वतःला आरशात पहा, कारण मला तू आवडतेस.’
फॅन्स आणि फॉलोअर्सनी फोटोच्या कमेंट सेक्शनमध्ये हार्ट इमोजी पाठवले आहे आणि अंशुलाच्या या बदलाला पाठिंबा दिला आहे. अभिनेता भख्तियार इराणीनेही ‘वाह ये तो आग है’ अशी टिप्पणी केली आहे. या परिवर्तनावर टिप्पणी करताना एका चाहत्याने लिहिले, ‘व्वा काय परिवर्तन आहे. तुम्हाला स्क्रीनवर पाहण्याची वाट पाहत आहोत. आणखी एकाने लिहिले, ‘व्वा तुमचं वजन खूप कमी झालं आहे @anshulakapoor छान दिसत आहे.’
अंशुलाचा फोटो पाहून, अनिल कपूरची पत्नी सुनीता कपूर यांनी तिच्या मेकओव्हरवर खुश होत एक आनंदी इमोजी शेअर केला आहे, तर कतरिना कैफने तिच्या वजन कमी करण्याच्या बदलावाला प्रभावित होऊन “हिच्याकडे पहा” अशी टिप्पणी केली. अंशुला कपूरचा हा बदल पाहून तिच्या चाहत्यांमध्ये वाढ होईल यात काही शंकाच नाही. तसेच येत्या काळात ती चित्रपटश्रुष्टीत पदार्पण करणार की काय याचीही शंका वर्तवली जात आहे.
अलीकडेच, अंशुलाच्या बहिणी जान्हवी कपूर आणि खुशी कपूर यांनी गुरुवारी ज्येष्ठ स्टार श्रीदेवीच्या चौथ्या पुण्यतिथीनिमित्त एक फोटो शेअर केला. जान्हवी कपूरने श्रीदेवीच्या फोटोवर हृदयस्पर्शी कॅप्शन लिहिले आहे. खुशीने तिच्या लहानपणीचा एक फोटोही पोस्ट केला आहे. फोटोत ती आईच्या मांडीवर बसलेली दिसत आहे. अंशुला कपूरने हार्ट इमोजीसह या फोटोवर प्रतिक्रिया दिली आहे.
अंशुला आणि अर्जुन हे चित्रपट निर्माते बोनी कपूर यांची पहिली पत्नी मोना कपूर यांची मुले आहेत. त्यानंतर त्यांनी श्रीदेवीशी लग्न केले. अंशुला कपूर हा चित्रपटसृष्टीतील तो चेहरा आहे, ज्याला सर्वजण चांगलेच ओळखतात. अंशुला अशा स्टार किड्सपैकी एक आहे जे बॉलिवूड चित्रपटांचा भाग नसतानाही प्रसिद्ध आहेत. मात्र आता अंशुलाही लवकरच बॉलिवूड डेब्यूसाठी सज्ज झाल्याचे दिसत आहे. तिचे सध्याचे फोटो या वस्तुस्थितीची साक्ष देत आहेत.
महत्वाच्या बातम्या-
अंकिता लोखंडेने विकत घेतली आलिशान मर्सिडीज कार, किंमत वाचून डोळे पांढरे होतील
राणे पिता- पुत्रांना होणार अटक? दिशा सालियनप्रकरणी पोलिसांकडून नोटीस
अशुद्ध मराठी बोलणाऱ्यांना सोनालीने मारला टोमणा, नेटकऱ्यांनी तिच्याच चुका काढत झापले
रशियाने १५ वर्षांत सर्वोत्तम सैन्य कसं उभारलं? ज्याला घाबरून अमेरिकासुद्धा थरथर कापतीय; जाणून घ्या..