Share

Arjun Kapoor: अजुनतरी मलायकासोबत लग्नाचा विचार केला नाही कारण.., अर्जुन कपूरने केला मोठा खुलासा

malayka arjun

अर्जुन कपूर (Arjun Kapoor): ‘कॉफी विथ करण‘ हा संवाद कार्यक्रम आहे. हा कार्यक्रम प्रसिद्ध चित्रपट निर्माता दिग्दर्शक करण जोहरने होस्ट केला आहे. कार्यक्रमाचे ६ सिझन पूर्ण झाले आहेत. सध्या या कार्यक्रमाचे ७ वे सिझन सुरु आहे. करण जोहर या कार्यक्रमासाठी प्रसिद्ध चित्रपट व्यक्तिमत्त्वांना आमंत्रित करतो आणि त्यांच्या वैयक्तिक आयुष्यावर चर्चा करतो. हा शो २००९ मध्ये सुरु झाला आणि खूप यशस्वी झाला.

शोचा पहिला भाग १९ नोव्हेंबर २००४ रोजी प्रसारित झाला आणि त्याचा पहिला सीझन २७ मे २००५ रोजी संपला. काहीकाळ शो थांबवण्यात आला. चार वर्षांनंतर पुन्हा ७ नोव्हेंबर २०१० रोजी हा कार्यक्रम टीव्हीवर परतला. या नव्या सिझनचा सहावा एपिसोड गुरुवारी डिस्ने प्लस हॉटस्टार या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रसारित झाला. कॉफी विथ करणच्या सातव्या सीझनचा नवीन भाग गुरुवारी दुपारी १२ वाजता प्रसारित झाला.

रक्षाबंधनाच्या स्पेशल एपिसोडमध्ये अर्जुन कपूर त्याची चुलत बहीण सोनम कपूर यांनी हजेरी लावली. कॉफी विथ करणमध्ये होस्टने नेहमीच सेलिब्रिटींना त्यांच्या खासगी आयुष्याविषयी प्रश्न विचारले आहेत. करण जोहरने या वेळी अर्जुन कपूर याला सुद्धा त्याची गर्लफ्रेंड मलायका अरोराविषयी बरेच प्रश्न विचारले.

मलायकासोबत लग्नाबद्दल काय विचार आहेत?
“नाही, आणि प्रामाणिकपणे सांगायचं झाल्यास लॉकडाऊनमध्ये गेलेली दोन वर्षं, कोरोना महामारी आणि त्यामुळे बदललेल्या गोष्टी कारणीभूत आहेत. मला माझ्या करिअरवर लक्ष केंद्रीत करायचं आहे”, मलायकाशी इतक्यात लग्न करण्याचा कोणताच विचार नसल्याचं अर्जुनने स्पष्ट केलं. सध्या तो करिअरवर अधिक लक्ष केंद्रीत करत असल्याचं त्याने पुढे सांगितलं.

मलायकासोबतचं नातं सर्वांसमोर आणण्याचं कधी ठरवलंय?
“मी एक अत्यंत वास्तववादी व्यक्ती आहे करण, मला काहीही लपवण्याची गरज नाही. मी कोणत्याही गोष्टीला घाबरत नाही. मला खरोखर व्यावसायिकदृष्ट्या थोडं अधिक स्थिर व्हायला आवडेल. मी आर्थिकदृष्ट्या बोलत नाही, मी भावनिकदृष्ट्या या गोष्टींचा विचार करत आहे. मला असं काम करायला आवडेल ज्यातून मला आनंद मिळेल. कारण मी स्वत: आनंदी असल्यास, माझ्या जोडीदारालाही मी आनंदी ठेवू शकेन. मी सुखी जीवन जगू शकतो आणि मला वाटतं की माझा बराचसा आनंद हा मला माझ्या कामातून येतो,” असंही अर्जुनने स्पष्ट केलंय. अश्या बऱ्याच प्रश्नाचे उत्तर अर्जुनने दिले.

अर्जुनच्या वाढदिवशी सोशल मीडियावर मलायकाने पोस्ट लिहिली होती. त्यात तिने अर्जुनसोबत प्रेम असल्याचे कबुल केले होते. त्याचबरोबर अनेकदा पार्ट्यांमध्येही या दोघांना एकत्र पाहिलं गेलंय. गेल्या काही वर्षांपासून हे दोघं एकमेकांना डेट करत आहेत. इतकंच नव्हे तर या दोघांच्या लग्नाच्या चर्चांनाही सोशल मीडियावर उधाण आले होते.

महत्वाच्या बातम्या
Sunil raut : ..त्यानंतर ठाकरेंना मुख्यमंत्रिपदावरून हटवणाऱ्यांचा सुड घेणार, राऊतांच्या इशाऱ्याने खळबळ
राजू श्रीवास्तव यांची प्रकृती गंभीर, अजूनही बेशुद्ध अवस्थेत, समोर आली महत्वाची अपडेट
पंढरपूरचे विठ्ठल मंदिर शासनाच्या ताब्यातून काढण्यासाठी सुब्रमण्यम स्वामींनी थोपटले दंड, घेतला मोठा निर्णय
Sharad Pawar : शरद पवारांचा एकनाथ शिंदेंना सल्ला, म्हणाले, वादविवाद वाढविणे योग्य नाही, मी बाहेर पडल्यावर…    

बाॅलीवुड ताज्या बातम्या मनोरंजन

Join WhatsApp

Join Now