Share

Arjun Kapoor: बॉयकॉट ट्रेंडवर अर्जुन कपूर संतापला, म्हणाला, लोकांना धडा शिकवणे गरजेचे कारण..

Arjun Kapoor

Arjun Kapoor, boycott trend, film industry/ आमिर खान (Aamir Khan) स्टारर ‘लाल सिंह चड्ढा’ (Laal Singh Chaddha) आणि अक्षय कुमार (Akshay Kumar) स्टारर ‘रक्षा बंधन’ बॉक्स ऑफिसवर चांगलेच फ्लॉप झाले आहेत. यापूर्वी अर्जुन कपूर आणि जॉन अब्राहम स्टारर ‘एक व्हिलन रिटर्न्स’ या चित्रपटाचीही वाईट परिस्थिती होती. याचे मुख्य कारण सोशल मीडियावर सुरू झालेली बहिष्कार संस्कृती (बायकॉट ट्रेंड) असल्याचे मानले जाते.

तसेच आता ‘लाल सिंग चड्ढा’ आणि ‘रक्षा बंधन’ नंतर, रणबीर कपूर आणि आलिया भट्ट स्टारर ‘ब्रह्मास्त्र भाग एक: शिवा’ साठी सुरु झाली आहे. लोकांची ही प्रतिक्रिया पाहून अभिनेता अर्जुन कपूरचा संताप अनावर झाला आहे. एका मुलाखतीदरम्यान त्याने या संस्कृतीवर चांगलाच राग काढला आहे.

अर्जुन म्हणाला, मला वाटते की आम्ही (बॉलिवूडने) जास्त वेळ गप्प बसून चूक केली आहे. अर्जुन पुढे म्हणाला, आमची नम्रता ही आमची कमजोरी मानली गेली आहे. आम्ही नेहमी मानतो की, आपल्या कामातून दिसल पाहिजे, बाकी कोण काय बोलतंय काही फरक पडत नाही. आम्ही खूप सहन केले. आता लोकांना त्याची सवय झाली आहे.

सोशल मीडियावर सुरू असलेल्या बायकॉटच्या ट्रेंडवर बोलताना तो पुढे बोलला की, आपण एकत्र येऊन याबद्दल काहीतरी केले पाहिजे. कारण जे काही लिहिले जात आहे, जे काही हॅशटॅग वापरले जात आहेत, ते वास्तवापासून खूप दूर आहेत. काही अजेंडे जे अस्तित्वात नसतानाही खूप मोठे होतात.

अर्जुनच्या म्हणण्यानुसार या सगळ्याचा परिणाम फिल्म इंडस्ट्रीवर होत आहे. बायकॉटच्या ट्रेंडमुळे अलीकडच्या चित्रपटांच्या निराशाजनक कामगिरीबद्दल बोलताना अर्जुन म्हणाला, उद्योगाची चमक हरवत चालली आहे. आम्हाला खात्री होती की जर चित्रपटगृहे पुन्हा सुरू झाली तर चित्रपट चांगले चालतील आणि सर्व काही ठीक होईल.

अर्जुन पुढे म्हणाला, गेले दोन महिने चित्रपटसृष्टीसाठी वाईट गेले. कारण अनेक चित्रपट चांगले चालले नाहीत. मी असे गृहीत धरू शकतो की हे कथानक सेट आहे? नाही, मला वाटते की काही चित्रपट पुरेसे चांगले नव्हते. अशा स्थितीत नैरेटिवही चालत नाही. चित्रपट फारसा चांगला नसतो तेव्हा नैरेटिव तयार करणाऱ्यांना अधिक मसाला मिळतो.

दिग्दर्शक मोहित सुरीच्या ‘एक व्हिलन रिटर्न्स’मध्ये शेवटचा दिसलेला अर्जुन कपूरचा आगामी चित्रपट ‘द लेडी किलर’ 10 ऑक्टोबर रोजी थिएटरमध्ये दाखल होणार आहे. याशिवाय आकाश भारद्वाजच्या ‘कुट्टे’ या चित्रपटातही तो राधिका मदानसोबत दिसणार आहे. या चित्रपटात तब्बू आणि नसीरुद्दीन शाह यांच्याही प्रमुख भूमिका आहेत आणि हा चित्रपट 4 नोव्हेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे.

महत्वाच्या बातम्या-
Arjun Kapoor: अजुनतरी मलायकासोबत लग्नाचा विचार केला नाही कारण.., अर्जुन कपूरने केला मोठा खुलासा
Coffee with Karan : तुझ्या किती मैत्रिणींसोबत झोपला आहे अर्जुन कपूर? सोनम कपूरचे उत्तर ऐकून सगळेच थक्क
VIDEO: अभिनेता अर्जुन कपूरच्या बहिणीने कॅमेऱ्यासमोरच काढली ब्रा; म्हणाली, रविवारच्या ब्रंचनंतर घरी
जर हेच मी तुमच्या आई-बहिणींबद्दल लिहीले तर ट्रोलर्सच्या त्या कमेंटवर भडकला अर्जुन कपूर

ताज्या बातम्या बाॅलीवुड मनोरंजन

Join WhatsApp

Join Now