बॉलिवूड अभिनेता अर्जून कपूर आणि अभिनेत्री मलायका अरोरा (arjun kapoor and malaika arora) त्यांच्या रिलेशनशीपमुळे नेहमीच माध्यमात चर्चेत असतात. या दोघांसंबंधित प्रत्येक बातमी सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत असते. आताही हे दोघे पुन्हा एकदा माध्यमात चर्चेत आले आहेत. याचे कारण म्हणजे आज व्हॅलेंटाईन-डे च्या निमित्ताने दोघांनी एकमेकांसोबतचे रोमँटिक फोटो शेअर केले आहेत. त्यांचे हे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
मलायकाने तिच्या इन्स्टाग्राम हँडलवर अर्जून कपूरसोबतचा एक फोटो शेअर केला आहे. यामध्ये दिसत आहे की, मलायका अर्जूनला घट्ट मिठी मारली आहे तर अर्जून तिच्या माथ्यावर किस करत आहे. फोटो शेअर करत मलायकाने Mine असे लिहित एक हार्टचा इमोजीसुद्धा शेअर केला आहे.
मलायकाने हा फोटो शेअर करताच तो सोशल मीडियावर वेगाने व्हायरल झाला. आतापर्यंत तिच्या या फोटोला ५ लाखापेक्षा अधिक लाईक्स मिळाले आहेत. तसेच अनेक चाहते तिच्या या फोटोवर भरभरून कमेंट करत आहेत. चाहत्यांसोबत अनेक सेलिब्रिटीही मलायकाच्या या फोटोवर कमेंट करत आहेत.
दुसरीकडे अर्जून कपूरनेही मलायकासोबतचा एक फोटो शेअर केला आहे. या फोटोसोबत त्याने लिहिले की, ‘जेव्हा ती दूर जाते तेव्हा उजेड नसतो.. तेव्हा ती दूर जाते तेव्हा सुर्यप्रकाश दिसत नाही. जेव्हा ती दूर जाते तेव्हा कोणताच प्रकाश नसतो. आणि जेव्हाही ती लांब जाते तेव्हा ती खूप दूर निघून जाते’. अर्जूनच्या या कॅप्शनवरून लक्षात येते की, मलायकाशिवाय त्याच्या आयुष्यात कोणताच आनंद नाही.
https://www.instagram.com/p/CZ9DB3MLZ3l/
दरम्यान, मलायकाने २०१७ साली पती अरबाज खानला घटस्फोट दिला होता. अरबाज आणि मलायका ५ वर्ष एकमेकांना डेट केले होते. त्यानंतर या दोघांनी लग्न केला. त्यांना अरहान नावाचा मुलगा देखील आहे. मात्र, लग्नाच्या १९ वर्षानंतर मलायका आणि अरबाजने विभक्त होण्याचा निर्णय घेतला.
अरबाजसोबत घटस्फोट झाल्यानंतर मलायका अर्जून कपूरला डेट करू लागली. परंतु, मात्र, अर्जूनसोबतच्या नात्यामुळे तिला अनेकदा ट्रोलिंगला सामोरे जावे लागले. मलायका घटस्फोटित असून तिला एक मुलगा आहे. तसेच अर्जूनपेक्षा ती १२ वर्षांनी मोठी आहे. या कारणावरून तिच्यावर अनेक लोकांनी टीका केली. परंतु, या सर्वांना सामोरे जात ती अर्जून कपूरसोबतच्या प्रेमासाठी ठामपणे उभी राहिली.
मलायकासोबतच्या नात्याबाबत नुकतीच एका मुलाखतीत बोलताना अर्जूनने कपूरने म्हटले की, आमच्या या नात्यामुळे आम्हाला कित्येक दिवस कठिण काळातून जावे लागले. आमच्या नात्याबाबत अनेक अंदाज लावण्यात आले, वेगवेगळ्या फालतू गोष्टी बोलण्यात आल्या. परंतु अनेक अडचणींनंतरही आम्ही दोघे एकमेकांसोबत उभे राहिलो. मलायकालाही खूप काही ऐकावं लागलं होतं. आणि तिने ते सहनही केलं. पण तिने आमच्या नात्याला इतका आदर आणि महत्त्व दिला आहे, यासाठी मी तिचे कौतुक करतो.
महत्त्वाच्या बातम्या :
‘अल्ला हू अकबर’च्या घोषणा देणाऱ्या मुलीला सलमान-आमिरने दिले ३ कोटी रूपये? वाचा व्हायरल पोस्टमागचे सत्य
रवी तेजाच्या ‘खिलाडी’ चित्रपटामुळे अक्षय कुमारचे चित्रपट निर्माते संतापले, कोर्टात केली केस
‘ब्रम्हास्त्र’ चित्रपटाच्या सेटवरून समोर आला नवा फोटो; एकमेकांच्या नजरेत हरवलेले दिसून आले रणबीर-आलिया