Share

‘व्हॅलेंटाईन डे’च्या दिवशी अर्जुन कपूरने मोकळे केले मन; म्हणाला, ‘आमचे आयुष्य नरक झाले होते’

Arjun Kapoor

बॉलिवूड अभिनेता अर्जून कपूर (Arjun Kapoor) आणि अभिनेत्री मलायका अरोरा (Malaika Arora) दीर्घकाळापासून एकमेकांना डेट करत आहेत. हे दोघे आपल्या नात्याबाबत सार्वजनिकरित्या कमीच प्रमाणात बोलत असले तरी सोशल मीडियावर ते नेहमी एकमेकांवर प्रेम व्यक्त करताना दिसून येतात. दोघेही नेहमी एकमेकांसोबतचे फोटो आणि व्हिडिओ त्यांच्या सोशल मीडिया हँडवलर शेअर करत असतात. परंतु, त्यांच्या या नात्यामुळे दोघांना अनेकदा लोकांच्या टीकेला सामोरे जावे लागले.

मलायकाचे अरबाज खानसोबत घटस्फोट झाले. तिला एक मुलगा आहे. तसेच अर्जूनपेक्षा १२ वर्षांनी ती मोठी आहे. त्यामुळे या दोघांच्या नात्यावरून अनेकवेळा त्यांना ट्रोल करण्यात आले. परंतु, तरीही या सर्वांना सामोरे जात त्या दोघांनी त्यांचं प्रेम जगासमोर ठाम मांडलं आहे. यादरम्यान नुकतीच एका मुलाखतीत बोलताना अर्जून कपूरने मलायकासोबतच्या नात्यावर मोकळेपणाने बोलला आहे.

अर्जून कपूरने व्हॅलेंटाईन डे च्या निमित्ताने हिंदुस्तान टाईम्स या वेबसाईटला मुलाखत दिली. या मुलाखतीत त्याला मलायकासोबतच्या नात्याबाबत अनेक प्रश्न विचारण्यात आले. अर्जूननेही या मुलाखतीत सर्व प्रश्नांची मोकळेपणाने उत्तरे दिली. अर्जूनला विचारण्यात आले की, चांगल्या-वाईट काळात तू मलायकाला नेहमी साथ दिलास.

https://www.instagram.com/p/CZ9DB3MLZ3l/

यावर उत्तर देताना अर्जूनने म्हटले की, ‘मी तर तिची साथ दिलीच आहे सोबतच तिनेही नेहमी माझी साथ दिली आहे. कठिण काळात आम्ही दोघेही नेहमी एकमेकांच्या सोबत असतो. पण सोशल मीडियामुळे सर्व काही खूप गढूळ झाल्या होत्या. आमच्या नात्याबाबत अनेक अंदाज लावण्यात आले, वेगवेगळ्या प्रकारच्या फालतू गोष्टी बोलण्यात आल्या. परंतु अशा अनेक अडचणींनंतरही आम्ही एकमेकांसोबत राहिलो आहोत’.

त्याने पुढे म्हटले की, ‘कित्येक दिवस आमचे जीवन नरक झाले होते. पण त्यातूनही आम्ही सावरत पुढे आलो. मलायकाला खूप काही ऐकावं लागलं होतं. पण तिने ते सहन केलं. तिने आमच्या नात्याला इतका आदर आणि महत्त्व दिला आहे, यासाठी मी तिचे कौतुक करतो. तसेच मलायकासोबत ठामपणे उभा राहिल्याने मला कधी असमान्य असे वाटलं नाही. मला तर फक्त असे वाटले की, मी सत्यासोबत उभा आहे. आणि मी अतिशय सामान्य गोष्ट करत आहे’.

दरम्यान, मलायकाने २०१७ साली पती अरबाज खानला घटस्फोट दिला होता. अरबाज आणि मलायका ५ वर्ष एकमेकांना डेट केले होते. त्यानंतर या दोघांनी लग्न केला. त्यांना अरहान नावाचा मुलगा देखील आहे. मात्र, लग्नाच्या १९ वर्षानंतर मलायका आणि अरबाजने विभक्त होण्याचा निर्णय घेतला.

महत्त्वाच्या बातम्या :
शिल्पा शेट्टीसह तिची बहिण आणि आईविरोधात समन्स जारी, तब्बल ‘एवढ्या’ लाखांचे कर्ज परत न केल्याचा आरोप
राखीच्या चाहत्यांना मोठा धक्का! राखी आणि रितेश एकमेकांपासून होणार वेगळे, पोस्ट शेअर करत म्हणाले..
बॉयफ्रेंडसोबत हॉटेलमध्ये गेली होती अमृता राव, पुढे घडलं असं काही की जावं लागलं थेट हॉस्पिटलमध्ये

बाॅलीवुड मनोरंजन

Join WhatsApp

Join Now