मराठी सिनेइंडस्ट्रीमधील प्रसिद्ध अभिनेत्री रिंकू राजगुरू सध्या चर्चेत आहे. ती सध्या मराठी सिनेइंडस्ट्रीमधील एका अभिनेत्याला डेट करत आहे. अशी चर्चा सर्वत्र रंगली आहे. नागराज मंजुळे यांच्या चित्रपटातून अभिनेत्री रिंकू राजगुरू हिला लोकप्रियता मिळाली.(Archie and Parsha Sairat! Rinku himself shocked fans by posting)
सैराट या चित्रपटामुळे तिला अर्ची या नावाने लोकप्रियता मिळाली. सैराट चित्रपटानंतर तिने कधी मागे वळून पहिले नाही. यानंतर रिंकूने अनेक मराठी चित्रपट तसेच हिंदी वेबसिरीजमध्ये काम केले आहे. रिंकू राजगुरू नेहमी तिज्या खाजगी आयुष्यामुळे चर्चेत असते.
याच दरम्यान रिंकू राजगुरू मराठी सिनेइंडस्ट्रीमधील एका प्रसिद्ध अभिनेत्यासोबत डिनरडेटला गेली होती. त्याच्यासोबतचे फोटो तिने इंस्टाग्राम स्टोरीवर शेयर केले आहे. त्यानंतर तिचे त्याच्या सोबत अफेअर असल्याच्या चर्चांना उधान आले आहे.
रिंकू राजगुरू हिने तिच्या इंस्टाग्राम स्टोरीवर सैराटमधील तिचा सहकलाकार आकाश ठोसर सोबतचे फोटो शेयर केले आहेत. रिंकूने शेयर केलेले फोटो आकाशनेदेखील त्याच्या इंस्टाग्राम स्टोरीवर शेयर केले आहेत. त्या फोटोसोबत त्याने लिहिले आहे कि, खूप खाल्ले यार उद्या जरा जास्त कार्डिओ करायला लागणार.
त्यासोबत रिंकू राजगुरू आणि आकाश ठोसरने त्यांचा गाडीमधला व्हिडिओही शेयर केला आहे. त्या व्हिडिओसोबत त्यांनी लिहिले आहे, कि लवकरच पुन्हा भेटू. सैराट चित्रपटातील परश्याची आणि अर्चीची लवस्टोरी चाहत्यांना खूप भावली होती.
रिंकू राजगुरू सैराटनंतर मेकअप, कागर या चित्रपटात दिसली. त्यानंतर ती १००, २०० हल्ला हो या वेबसिरीजमध्ये झळकली आहे. त्यानंतर आता ती छूमंतर या मराठी चित्रपटात दिसणार आहे. तर आकाश ठोसर एफ यू फ्रेंडशिप अनलिमिटेड या चित्रपटात झळकला आहे.
महत्वाच्या बातम्या
समीर वानखेडे प्रकरणात नवाब मलिकांचा पाय खोलात, केंद्रिय अनुसूचित जाती आयोगाने उचलले मोठे पाऊल
धक्कादायक! शेतात नग्नावस्थेत आढळला रात्री जागरणाला गेलेल्या महिलेचा मृतदेह, परिसरात खळबळ