‘द कपिल शर्मा शो’ हा कॉमेडी शो जूनमध्ये ब्रेक घेणार आहे. त्यानंतर आपल्या विचित्र हसण्याने ओळखली जाणारी अर्चना पूरण सिंग ‘इंडियाज लाफ्टर चॅम्पियन’ या वेगळ्या शोमध्ये दिसणार आहे. अर्चना या शोला जज करणार आहे. याबद्दल माहिती देत असताना अर्चनाने तिच्या आणि पती परमीत यांच्यातील काही गोष्टीचा देखील खुलासा केला आहे.
यावेळी अर्चनाने सांगितले की, पती परमीत यांच्या वयातील फरकाचा त्यांच्या रिलेशनशिपमध्ये कधीच फरक पडला यामुळे त्यांच्यात कधीच भांडणे झाली नाहीत. त्यांच्या लग्नाला 30 वर्षे होऊन गेली. तसेच त्यांच्या पती पत्नीच्या नात्याबद्दल तिने अधिक खुलासा केला, अनेक गोष्टी सांगितल्या.
अर्चनाला म्हणाली, टीव्हीवर तुम्ही मला इतर लोकांच्या विनोदांवर हसताना पाहता. पण घरी देखील मी विदूषक आहे, अशाच पद्धतीने हसत असते. विनोद करत असते. माझे पती आणि मुले माझ्या विनोदांवर आनंदाने हसतात. माझ्या या हसण्याला माझ्या घरच्यांनी नेहमीच साथ दिली.
तिच्या कारकिर्दीबद्दल बोलताना ती म्हणाली, परमीत आणि मी नेहमी या गोष्टीचा विचार करून हसायचो की, आमची कथा एखाद्या चित्रपटासारखी कशी असेल, जिथे पत्नीचे करिअर तिच्या नवऱ्यापेक्षा जास्त प्रगती करत असते. मग चित्रपटाप्रमाणे कल्पना करून आम्हालाच हसू यायचे.
वयात सात वर्षांचे अंतर असलेल्या दोघांनी ३० वर्षांपूर्वी लग्नगाठ बांधली. यावर अर्चनाला प्रश्न केला तर म्हणाली, १९९२ मध्ये परमीतसोबत लग्न करण्यापूर्वी आम्ही चार वर्षे रिलेशनशिपमध्ये होतो आणि आम्ही आमच्यातील वयाच्या अंतराविषयी बोललो, पण आम्हाला कधीच असे वाटले नाही की या कारणामुळे आम्ही एकमेकांसोबत नाही राहू शकत.
मात्र, आमच्या वयातील फरकामुळे आमच्या लग्नाला घरच्यांनी नकार दिला होता. मला देखील विचार करण्यास सांगितले होते. पण माझ्या मनात कधीच शंका आली नाही, की आमच्या वयातील फरकामुळे आमच्या रिलेशनशिपवर फरक पडेल. आज ३० वर्षांनंतर दोन मुले, आणि आम्ही दोघे एकत्र आहोत. वयाच्या अंतरामुळे आम्हांला कधीही कोणत्याही गोष्टीचा सामना करावा लागला नाही.
ती पुढे म्हणते, मला आनंद आहे की परमीत माझ्या आयुष्यात खूप समजूतदार व्यक्ती म्हणून राहिला. त्याने मला नेहमीच पाठिंबा दिला आहे. जरी त्याच्या कारकिर्दीची सुरुवात संथपणे झाली असली तरी त्याने अनेक चित्रपट आणि वेब शोमध्ये चांगले काम केले आहे. तो एक चांगला लेखक आणि दिग्दर्शक देखील आहे. त्याने आपल्या कारकिर्दीत स्वतःला सिद्ध केले आहे.