शेखर सुमन आणि अर्चना पूरण सिंग यांचा नवा शो ‘इंडियाज लाफ्टर चॅम्पियन’ सुरू झाला आहे. सोनीवर प्रसारित होणाऱ्या या शोमध्ये दोघेही जजच्या भूमिकेत दिसत आहेत. शोदरम्यान शेखर सुमन म्हणाले की, अर्चना पूरण सिंगचे नाव गिनीज बुकमध्ये नोंदवले जावे. ती लोकांना खूप हसवत राहते. त्यावर अभिनेत्रीला एक जुना किस्सा आठवला. त्या म्हणाली की, आपल्याला नेहमी हसत राहावे लागते. पण कधी कधी आपलं हसणंही दुखावतं. जे लोकांना दिसत नाही. ( archana puan sing says, Although my mother-in-law passed away, I was laughing )
अर्चना पूरण सिंग यांनी याविषयी बोलताना सांगितले की, जेव्हा माझ्या सासूचे निधन झाले. तेव्हा मी 15 मिनिटे हसले, कधी कधी इच्छा नसतानाही हसावे लागते. हे कलाकाराचं आयुष्य असतं. आजही तो क्षण आठवला की डोळ्यातून अश्रू वाहू लागतात.
पुढे त्या म्हणाल्या, ‘हे कॉमेडी सर्कसबद्दल आहे, जेव्हा मी त्याशोचे शूटिंग करत होते तेव्हा माझ्या सासूबाई खूप आजारी होत्या. त्यांच्यावर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते आणि मला शूटिंगसाठी जायचे होते. मी शूटिंगमध्ये असताना मला संध्याकाळी ६ वाजता कळले की, माझ्या सासूचे निधन झाले आहे. मी शूटिंग करणाऱ्यांना सांगितले की मला लगेच निघून जावे लागेल. माझ्या सासूचे निधन झाले आहे.
ज्यावर मला शूटिंग करणारे लोकं म्हणाले, मॅडम तुम्ही १५ मिनिटांत तुमची प्रतिक्रिया दिल्यानंतरच निघू शकता. तेव्हा माझ्याकडे काही पर्याय नव्हता. मोठा पंच, छोटा पंच, लहान हास्य, मध्यम हास्य, मोठा हास्य, असे करत मी 15 मिनिटे शूट केले. त्यावेळी मी मोठ्याने हसत होते आणि आतून रडत होते. माझ्यासाठी तो सर्वात कठीण काळ होता. ती माझी मजबुरी होती. देवाने अशी स्थिती कोणावरही आणू नये.
त्यानंतर शेखर सुमन सांगतात की, माझा मुलगा आयुष 11 व्या वर्षी वारला. त्याच्या जाण्याने मला खूप दुःख झाले. तो धक्का पेलायला बराच वेळ लागला. पण आयुष्य पुन्हा रुळावर आले आहे आणि आता मी लोकांसोबत आनंद शेअर करण्याचे काम करतो.
अर्चना पूरण सिंग यांनी ९० च्या दशकात अनेक सिनेमांमध्ये काम केले होते. त्यानंतर बॉलीवूड सिनेमांमध्ये सहाय्यक भूमिका करताना त्यांना प्रेक्षकांनी पाहिले आहे. छोट्या पडद्यावर ‘ क्वीन’ म्हणून अर्चना पूरण सिंग फार लोकप्रिय झाल्या. अर्चना पूरण सिंग यांचा चाहता वर्गही फार मोठा आहे.
महत्वाच्या बातम्या-
एवढ्या दोन वर्षात सुशांतच्या मृत्युचा तपास कुठपर्यंत पोहोचला? मुख्य आरोपी आता काय करतायत?
‘या’ IPS ने संजय दत्तला सगळ्यांसमोर चोपला होता; वाचा त्यांनी स्वत:च सांगीतलेला थरारक किस्सा
राज्यसभेत भाजपला जिंकवून देण्याचा मास्टर प्लॅन ‘या’ माजी शिवसैनिकानेच आखला; एकेकाळी होता ठाकरेंचा विश्वासू