Share

PHOTO: ‘रात्रीस खेळ चाले’ फेम अपूर्वा पुन्हा झळकणार ‘या’ मालिकेत, साकारणार ऐतिहासिक भूमिका

apurva nemlekar as Rani Chennamma

झी मराठी वाहिनीवरील ‘रात्रीस खेळ चाले’ ही मालिका प्रचंड गाजली होती. या मालिकेत शेवंता या भूमिकेद्वारे अभिनेत्री अपूर्वा नेमळेकर खूपच लोकप्रिय झाली होती. पहिल्या सीझनला मिळालेल्या यशानंतर मालिकेचा दुसरा सीझनही प्रेक्षकांच्या भेटीला आला. या सीझनमध्येही अपूर्वाने आपल्या भूमिकेद्वारे प्रेक्षकांचे मन जिंकून घेतले. मात्र, त्यानंतर आलेल्या तिसऱ्या सीझनमधून अपूर्वा काही कारणाने बाहेर पडली. तर आता एका नव्या मालिकेद्वारे अपूर्वा (apurva nemlekar as Rani Chennamma )प्रेक्षकांच्या भेटीला येण्यास सज्ज झाली आहे.

अपूर्वा सोनी मराठी वाहिनीवरील स्वराज्य सौदामिनी ताराराणी या मालिकेत एक दमदार भूमिका साकारत आहे. मालिकेत ती राणी चेन्नमाची भूमिका साकारत आहे. याबाबत स्वतः अपूर्वाने सोशल मीडियाद्वारे माहिती दिली आहे. अपूर्वाने तिच्या इन्स्टाग्राम हँडलवर मालिकेतील तिच्या नव्या भूमिकेच्या वेशभूषेतील फोटो शेअर केले आहेत.

यासोबत तिने लिहिले की, ‘अभिनेत्री या नात्याने, विविध माध्यमातून कल्पकतेची अभिव्यक्ती आणि सजीव पात्र साकारून त्याद्वारे विचारधारांचा प्रसार, हे माझ्या कार्याचे मी योगदान समजते. एका कलाकाराचा कायमच विविध प्रकारच्या भूमिका, या काल्पनिक होत्या. आत्ता जी भूमिका मी साकारते आहे, ती केवळ वास्तविक नसून ते पात्र-ती भूमिका, आपल्या गौरवशाली इतिहासाचा एक घटक आहे’.

‘ही भूमिका हुबेहूब साकारन्याची, माझ्यावरती खूप मोठी जबाबदारी वाटते. हे ऐतिहासिक पात्र साकारून इतिहासाचे उपासक तसेच माझ्या चाहत्यांच्या अपेक्षेची पूर्तता, हे खूप मोठे आव्हानच होय. मला या भूमिकेसाठी जेव्हा प्रथम प्रस्ताव आला, तेव्हा मला, हे माझे स्वारस्य नाही, त्यामुळे मी भूमिकेला न्याय देऊ शकेल का? असे माझ्यासमोर खूप मोठे मानसिक आव्हान सामोरे आले. त्यावेळी मी ठरवले की, ही भूमिका स्वीकारण्याआधी सर्वप्रथम राणी चेनम्माची व्यक्तीरेखा जाणून घ्यावी आणि त्यासाठी त्याच्याशी निगडीत इतिहास अभ्यासावा’.

अपूर्वाने पुढे लिहिले की, ‘त्यानुसार मी इतिहास जाणून घेतला तेव्हा मी खूप उत्तेजित झाली आणि त्याक्षणी मला हे आव्हान स्विकारण्याचा जबरदस्त आत्मविश्वास आला. आपण ही भूमिका साकारलीच पाहिजे असा मी मनाशी ठाम निश्चय केला. इतिहास जाणून घेतल्यानंतर मला त्या पात्रात उतरणे सहज झाले. कधी कधी अशा भूमिका साकारताना आपण चाहत्यांच्या दृष्टीकोनातून एक प्रमाण बनतो. ते आपल्याला वास्तवात त्या ऐतिहासिक व्यक्तिरेखेत पाहू लागतात. आणि भाबड्या चाहत्यांना तो कलाकाराचा एक आदर्श बनतो. हिच या कालकारीकतेची आणि अभिनय या व्यवसायाची मोठी ताकत मी समजते’.

अपूर्वाने शेवटी लिहिले की, ‘मला ही भूमिका साकारताना वैयक्तिक पातळीवर खूप मोठी नैतिक जबाबदारी जाणवते. आशा करते मी आपल्या सर्वांच्या अपेक्षेला खरी उतरेल. आपल्या सर्वांचे आजवर असिमीत प्रेम आणि आशीर्वाद लाभत राहिला, ते यापुढेही असेच वृद्धिंगत होईल, अशी आशा करते. अपूर्वाच्या या पोस्टवर अनेक चाहत्यांनी कमेंट करत तिला नव्या भूमिकेसाठी शुभेच्छा दिल्या आहेत’.

अपूर्वाने झी मराठीवरील ‘आभास हा’ या मालिकेतून छोट्या पडद्यावर पदार्पण केले होते. त्यानंतर तिने ‘तू माझा सांगाती’, ‘आराधना’, ‘तू जीवाला गुंतवावे’, ‘प्रेम’ या मालिकांमध्ये काम केले आहे. ‘रात्रीस खेळ चाले’ या मालिकेमुळे तिला फार लोकप्रियता मिळाली होती. या मालिकेतील शेवंता या भूमिकेने तिने प्रेक्षकांचा मने जिंकून घेतली होती. तर लवकरच आता नव्या भूमिकेद्वारे अपूर्वा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

एक उत्तम उत्तम अभिनेत्री असण्यासोबतच अपूर्वा एक उद्योजिका देखील आहे. २०१५ साली अपूर्वाने तिच्या हँडमेड दागिन्यांचा ब्रँड बाजारात उतरवला होता. ‘अपूर्वा कलेक्शन’ असं तिच्या ज्वेलरी ब्रँडचं नाव आहे. अभिनयातून वेळ काढून अपूर्वाने उद्योग क्षेत्रात उतरणं हे नक्कीच कौतुकास्पद आहे.

महत्त्वाच्या बातम्या :
लेक चालली सासरला! अलका कुबल यांच्या लेकीचा थाटामाटात पार पडला लग्नसोहळा, पहा खास फोटो
‘पुष्पा’मध्ये ‘झुकेगा नहीं’ म्हणत दाढीखालून हात फिरवण्याची कल्पना कशी सुचली होती? अल्लू अर्जुनने केला खुलासा
कार्तिक आर्यनच्या धमकीमुळे रिलीज होऊ शकला नाही ‘अला वैकुंठपुरमलो’चा हिंदी व्हर्जन? निर्मात्याचा खळबळजनक खुलासा

ताज्या बातम्या

Join WhatsApp

Join Now