कोरोनाच्या दोन वर्षानंतरच्या महामारीच्या काळानंतर आता जग हळूहळू सावरत असताना, Apple कंपनीसंदर्भात एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. Apple कंपनीच्या एका निर्णयानंतर अँपल कंपनीचे कर्मचारी सध्या नाराज असल्याचं दिसत आहे. त्यातच अनेक जण नोकरी सोडण्याच्या देखील विचारात असल्याचं दिसत आहे.
कोरोना काळात Apple आणि Google सारख्या कंपन्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होम दिले होते. मात्र आता कोरोना परिस्थितीमधून संपूर्ण जग बाहेर पडत आहे. बऱ्याच ठिकाणी कोरोना परिस्थिती आटोक्यात आली आहे. लोकांचे जीवन पूर्वपदावर आले आहे. यामुळे Apple आणि Google सारख्या कंपन्यांनी मोठा निर्णय घेतला आहे.
अँपल कंपन्यांनी घरून काम करणाऱ्या आपल्या कर्मचाऱ्यांना परत कामावर बोलावले आहे. मात्र कंपनीच्या याच निर्णयावर कर्मचारी नाराज असल्याचं दिसत आहे. अँपल चे जवळपास 76 टक्के कर्मचारी कंपनीच्या कार्यालयात परतण्याच्या निर्णयाविरोधात आहेत.
कंपनीने घेतलेल्या निर्णयानुसार कंपनीच्या कर्मचाऱ्यांना आठवड्यातून एकदा कार्यालयात येणं आवश्यक आहे. अँपलचे सीईओ टिम कुक यांनी 23 मे पासून कर्मचाऱ्यांना आठवड्यातून किमान तीन दिवस कार्यालयात राहण्यास सांगितले आहे. यामुळे कर्मचारी आणखी निराश झालेले पाहायला मिळत आहे.
एका सर्वेक्षणातून देखील ही बाब समोर आली आहे की, अँपल चे बहुतांश कर्मचारी ऑफिसमध्ये परत बोलवण्याच्या निर्णयामुळे नाराज आहेत. कंपनीने घेतलेल्या निर्णयामुळे काहीजण तर नोकरी देखील सोडण्याच्या तयारीत आहेत. कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे की त्यांना नियमित आता ऑफीसला यायला अनेक समस्यांना सामोरे जावे लागते.
तसेच, आता कंपनीच्या या निर्णयामुळे काही जण दुसरी नोकरी शोधण्याचा प्रयत्न करत असल्याचं देखील सर्वेक्षणातून पुढं आलं आहे. माहितीनुसार, Google कडून देखील आपल्या नाराज कर्मचाऱ्यांना कामावर बोलवण्यासाठी मोफत इलेक्ट्रिक स्कूटर देऊन त्यांना प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न सुरू आहे.