आम आदमी पक्षाने दिल्लीची महापालिका म्हणजेच MCD ही ताब्यात घेतली आहे. निवडणूक निकालामध्ये ‘आप’ला स्पष्ट बहुमत मिळत आहे. ताज्या आकडेवारीनुसार आम आदमी पार्टीला 133, भाजपला 104 आणि काँग्रेसला 09 जागा मिळाल्या आहेत. एमसीडीमध्ये गेल्या दीड दशकांपासून सत्तेत असलेल्या भाजपचा धुव्वा उडवत आपने भाजपला मोठा दणका दिला आहे.
महापालिकेची निवडणूक असूनही ही निवडणूक हायप्रोफाईल बनली होती. दिल्ली विधानसभा निवडणुकीत ‘आप’ सातत्याने भाजपचा पराभव करत होता, पण दिल्ली महापालिकेत भाजपने दीड दशकांपासून आपली सत्ता कायम ठेवली होती. पण आपने भाजपची सत्ता उखडून टाकली.
एमसीडीमध्ये गेली 15 वर्षे भाजपची सत्ता होती पण अखेर केजरीवाल यांनी हा मजबूत बालेकिल्ला उद्ध्वस्त केला. आम आदमी पार्टीने 2017 मध्ये पहिल्यांदाच MCD निवडणूक लढवली आणि पहिल्याच निवडणुकीत काँग्रेसला मागे टाकून भाजपचा मुख्य प्रतिस्पर्धी म्हणून उदयास आला.
यावेळी एमसीडी निवडणुकीत भाजपचे सर्व प्लॅन फसल्याप्रमाणे झाडू चालला आहे. भाजपने निवडणुकीत पूर्ण ताकद लावली होती. राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशिवाय केंद्रीय मंत्री आणि राष्ट्रीय नेत्यांची संपूर्ण फौज तैनात करण्यात आली होती. भाजपचे दिग्गज नेते निवडणुकीच्या प्रचारात होते. धुमधडाक्यात रॅली, रोड शो, रस्त्यावरील कोपरा सभा होत होत्या पण आम आदमी पक्षासमोर ते चालले नाही.
ही निवडणूक जिंकून आम आदमी पक्षाला संपूर्ण देशाला हा संदेश द्यायचा होता की भाजपचा विजयरथ कोणी रोखू शकत असेल तर ते फक्त केजरीवाल आहेत. यात ते यशस्वी होताना दिसत आहे. अपेक्षेप्रमाणे निवडणूक निकालात ‘आप’ला क्लीन स्वीप मिळालेला नसला, तरी भाजप आणि ‘आप’मधील जागांचे अंतर खूप आहे. दुसरीकडे गेल्या निवडणुकीप्रमाणे यावेळीही काँग्रेसला भरीव कामगिरी करता आलेली नाही.
ही निवडणूक जिंकण्यासाठी भाजपने सर्व शक्ती पणाला लावली होती, पक्षाने केंद्रीय मंत्र्यांसह अनेक राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना प्रचारात उतरवले होते. पण भाजपने उपस्थित केलेल्या मुद्द्यांपेक्षा केजरीवारांनी उपस्थित केलेल्या कचऱ्याच्या मुद्द्याने सगळ्यांनाच मात दिल्याचे दिसते.
दिल्लीत गेल्या अनेक वर्षांपासून कचऱ्याचे तीन डोंगर उभे आहेत, मात्र आजपर्यंत तो निवडणुकीचा मुद्दा बनला नाही. यावेळी अरविंद केजरीवाल यांनी या तीन कचऱ्याच्या डोंगरांचा मुद्दा उपस्थित करून भाजपला चांगलेच अडचणीत आणले.
ही निवडणूक या अर्थानेही विशेष आहे की, एकत्रीकरणानंतरची ही पहिलीच निवडणूक आहे. केंद्र सरकारने या वर्षाच्या सुरुवातीला दिल्लीतील तीन महापालिकांचे पुन्हा एकत्रीकरण केले होते. एकत्रीकरणानंतर दिल्लीतील वॉर्डांची संख्या 250 झाली होती.
महत्वाच्या बातम्या
मंत्र्यांसमोरच तुफान राडा; भाजपच्या आमदार आणि पदाधिकाऱ्यांची एकमेकांना लाथा बुक्क्यांनी मारहाण
राज्यसभा निवडणूकीत MIM चं ठरलं; भाजपही नाही अन् शिवसेनाही नाही, ‘या’ पक्षाला देणार पाठींबा
बिग ब्रेकींग! काँग्रेसने ‘मविआ’चा हात सोडला; ‘या’ निर्णयामुळे शिवसेनेला बसणार फटका
‘या’ कारणामुळे भाजपने पंकजा मुंडेना पुन्हा डावलले; निवडणुकीच्या दिवशीच समोर आले गुपित